Join us  

...तर शाळा सोडावी लागेल, शाळेच्या आवारातच गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 7:13 AM

दारूच्या बाटल्यांचा खच, दिवसाढवळ्या नशा करणारे गर्दुल्ले आणि विद्यार्थिनीची छेडछाड... हा प्रकार आहे, सांताक्रुझच्या शास्त्रीनगर महापालिका शाळा आवारातील,

गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : दारूच्या बाटल्यांचा खच, दिवसाढवळ्या नशा करणारे गर्दुल्ले आणि विद्यार्थिनीची छेडछाड... हा प्रकार आहे, सांताक्रुझच्या शास्त्रीनगर महापालिका शाळा आवारातील, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक सध्या धास्तावले आहेत. या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची विनंती विद्यार्थिनींकडून होत आहे. ‘..अन्यथा आम्हाला शाळा सोडावी लागेल,’ अशी लेखी तक्रार विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाकडे दिली आहे.सांताकु्रझ पूर्वेच्या वाकोला परिसरात शास्त्रीनगर महापालिका शाळा आहे, ज्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी माध्यम तर पहिली ते आठवीपर्यंत मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमाची शाळा आहे. गेल्या महिन्यात दहावीतील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीनुसार शाळेचे मैदान आम्हाला खेळण्यासाठी उपलब्ध नाही. कारण या ठिकाणी दारू पिणाºया आणि नशा करणाºयांचा आम्हाला त्रास होतो. या मैदानात खेळाच्या तासासाठी गेलेल्या विद्यार्थिनींना पाहून अश्लील शेरेबाजी, शिट्ट्या मारणे असे प्रकार घडतात, ज्यामुळे घाबरून त्या विद्यार्थिनी मैदानावर येण्यास धजावत नाहीत. एखाद्या शिक्षकाने तक्रार केल्यास त्याच्याही जिवाला धोका उद्भवू शकतो, ज्यामुळे याविरोधात कोणी तक्रारही करीत नाही. तेव्हा या सगळ्याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली आहे. कारण यावर उपाय न केल्यास आम्हाला शाळा सोडावी लागेल, असेही त्यांनी शिक्षकांना सांगितले आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : दारूच्या बाटल्यांचा खच, दिवसाढवळ्या नशा करणारे गर्दुल्ले आणि विद्यार्थिनीची छेडछाड... हा प्रकार आहे, सांताक्रुझच्या शास्त्रीनगर महापालिका शाळा आवारातील, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक सध्या धास्तावले आहेत. या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची विनंती विद्यार्थिनींकडून होत आहे. ‘..अन्यथा आम्हाला शाळा सोडावी लागेल,’ अशी लेखी तक्रार विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाकडे दिली आहे.सांताकु्रझ पूर्वेच्या वाकोला परिसरात शास्त्रीनगर महापालिका शाळा आहे, ज्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी माध्यम तर पहिली ते आठवीपर्यंत मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमाची शाळा आहे. गेल्या महिन्यात दहावीतील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीनुसार शाळेचे मैदान आम्हाला खेळण्यासाठी उपलब्ध नाही. कारण या ठिकाणी दारू पिणाºया आणि नशा करणाºयांचा आम्हाला त्रास होतो. या मैदानात खेळाच्या तासासाठी गेलेल्या विद्यार्थिनींना पाहून अश्लील शेरेबाजी, शिट्ट्या मारणे असे प्रकार घडतात, ज्यामुळे घाबरून त्या विद्यार्थिनी मैदानावर येण्यास धजावत नाहीत. एखाद्या शिक्षकाने तक्रार केल्यास त्याच्याही जिवाला धोका उद्भवू शकतो, ज्यामुळे याविरोधात कोणी तक्रारही करीत नाही. तेव्हा या सगळ्याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली आहे. कारण यावर उपाय न केल्यास आम्हाला शाळा सोडावी लागेल, असेही त्यांनी शिक्षकांना सांगितले आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :शैक्षणिकशाळा