जीव मुठीत घेऊन शाळेचा प्रवास
By Admin | Updated: August 9, 2014 01:00 IST2014-08-09T01:00:40+5:302014-08-09T01:00:40+5:30
महापालिकेच्या बेस्ट प्रशासनाने सुरू केलेली बस अध्र्या वाटेतच सोडत असल्याने आरे कॉलनीतील विद्यार्थी बिबटय़ाच्या भीतीने गेल्या महिन्याभरापासून जीव मुठीत घेऊन शाळेर्पयतचा प्रवास करत आहेत.

जीव मुठीत घेऊन शाळेचा प्रवास
>गोरेगाव : महापालिकेच्या बेस्ट प्रशासनाने सुरू केलेली बस अध्र्या वाटेतच सोडत असल्याने आरे कॉलनीतील विद्यार्थी बिबटय़ाच्या भीतीने गेल्या महिन्याभरापासून जीव मुठीत घेऊन शाळेर्पयतचा प्रवास करत आहेत.
गेल्या वर्षी एका शाळकरी विद्याथ्र्यावर शाळेतून घरी परतत असताना बिबटय़ाने हल्ला केला होता. त्यात त्या विद्याथ्र्याला आपला जीव गमवावा लागला होता. त्या वेळी लोकप्रतिनिधी व स्थानिक रहिवाशांच्या प्रयत्नाने विद्याथ्र्याना शाळेत पोहोचवण्यासाठी सौजन्य बससेवा चालू केली होती. आरे महापालिका शाळेत आरे कॉलनीतील 27 आदिवासी पाडय़ांतील सुमारे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. ही शाळा युनिट नंबर सोळा येथे डोंगराळ भागात आहे. या भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बसचालक बस शाळेच्या प्रवेशद्वारार्पयत न सोडता अध्र्या रस्त्यातच विद्याथ्र्याना उतरवतात. हा रस्ता निर्जन व झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. त्यामुळे एखाद्या वेळी परत बिबटय़ाने हल्ला करण्याची अथवा काही विपरीत घटना घडण्याची भीती पालक, विद्यार्थी व शाळेतील शिक्षकांना भेडसावत आहे.
याबाबत शाळा आणि पालकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिका:यांशी पत्रव्यवहार केला
आहे. (प्रतिनिधी)
रस्त्याच्या डागडुजीसाठी रस्ते विभागाशी चर्चा करण्यात आली आहे. बसचालकांना बस शाळेर्पयत नेणो धोक्याचे वाटते व अपघात होण्याची शक्यता असल्याकारणाने बस शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत नेत नाहीत. दोन दिवसांत रस्त्याचे काम व स्वच्छता करून बससेवा परत सुरू करण्यात येईल.
- जितेंद्र वळवी,
स्थानिक नगरसेवक