Join us

स्कूल बस बंदला संमिश्र प्रतिसाद, संघटनेच्या बस धावल्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 05:55 IST

चक्का जाम आंदोलनात सहभागी झाल्याने करण्यात आलेल्या स्कूल बस बंदला मुंबई शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

मुंबई : चक्का जाम आंदोलनात सहभागी झाल्याने करण्यात आलेल्या स्कूल बस बंदला मुंबई शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनात सहभागी झालेल्या स्कूल बस संघटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत त्यानुसार बस सुरू ठेवायच्या की नाहीत, याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करत या बंदला सहभाग दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर खासगी शाळांच्या बसेस सुरू होत्या, तर असोसिएशनच्या बस बंद होत्या.संघटनेच्या बसेस बंद राहणार असल्याच्या सूचना शाळांनी पालकांना आदल्या दिवशीच दिल्या. त्यामुळे बऱ्याचशा पालकांनी बस तसेच खासगी वाहनांचा आधार घेतला. सकाळी १० पर्यंत पाऊस असल्याने पालकांची दमछाक झाली. स्कूल बस संघटनेने पुकारलेल्या बंदला ९० टक्के यश मिळाल्याचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी स्पष्ट केले.रायन इंटरनॅशनल, विबग्योर हायस्कूल, चिल्ड्रेन अकॅडमी अशा शाळांच्या स्वत:च्या बसेस मात्र सुरळीत सुरू होत्या. त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.>पालकांची दमछाकस्कूल बस बंदबाबत शाळेने आधी सांगितले असले तरी अनेक पालकांची पाल्याला शाळेत ने-आण करताना दमछाक झाली. कांदिवलीच्या पवार हायस्कूलच्या पालक सुवर्णा कळंबे यांनी सांगितले, शाळेने पाठविलेल्या मेसेजमुळे स्कूल बस बंद राहणार असल्याची कल्पना आली. त्यानुसार कामाचे नियोजन करावे लागले.

टॅग्स :शाळा