शिष्यवृत्ती योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST2021-02-05T04:27:24+5:302021-02-05T04:27:24+5:30
मुंबई : मराठी विज्ञान परिषदेतर्फे, मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर साहाय्य मिळावे, या उद्देशाने २०१६ पासून शिष्यवृत्ती ...

शिष्यवृत्ती योजना
मुंबई : मराठी विज्ञान परिषदेतर्फे, मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर साहाय्य मिळावे, या उद्देशाने २०१६ पासून शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात एम. एस्सी. / एम. ए.च्या पहिल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना असून, प्रत्येक विषयातील दोन विद्यार्थी निवडण्यात येतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी आहे.
---------------------
कृषी पुरस्कार
मुंबई : मराठी विज्ञान परिषदेतर्फे, कृषी क्षेत्रात उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन म्हणून वसंतराव नाईक आणि बळीराजा - अण्णासाहेब शिंदे कृषी हे पुरस्कार दर तीन वर्षांनी दिले जातात. इच्छुकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज तपशिलासह पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जेष्ठ नागरिकांना मदत
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून युवा मैत्री सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आनंद निकेतन (ओल्डेज होम)मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी फळ वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धेश मयेकर, कुणाल जाधव, नितीन कदम, ऋषिकेश बाचनकर, ऋषिकेश पेडणेकर, ओमकार साळवी उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियान
मुंबई : वांद्रे येथील चेतना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत माझी वसुधंरा अभियानांतर्गत नुकतेच कचरा संकलन अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानात आपली मुंबई, कचरा मुक्त मुंबई हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांना इलेक्ट्रॉनिक, धातू, लाकूड, कापड, प्लास्टिक, कागद इत्यादी स्वरुपातील कचरा देणगी स्वरुपात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. मधुमिता पाटील, डॉ. महेशचंद्र जोशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत भगत, सिध्दांत जयराज, अंकिता माने उपस्थित होते.