१,७६,४०४ प्रवाशांचा निसर्गरम्य प्रवास, व्हिस्टाडोम डब्यातून नयनरम्य दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट पाहून समाधान
By सचिन लुंगसे | Updated: May 6, 2024 20:07 IST2024-05-06T20:07:11+5:302024-05-06T20:07:21+5:30
२०१८ मध्ये मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा चालविण्यात आले. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे मुंबई - मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला.

१,७६,४०४ प्रवाशांचा निसर्गरम्य प्रवास, व्हिस्टाडोम डब्यातून नयनरम्य दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट पाहून समाधान
मुंबई : मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या, धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले व्हिस्टाडोम डबे लोकप्रिय ठरत आहे. २०२३-२४ मध्ये या निसर्गरम्य प्रवासाचा १,७६,४०४ प्रवाशांनी लाभ घेतला. त्यामुळे मध्य रेल्वेला २६.५० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले.
२०१८ मध्ये मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा चालविण्यात आले. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे मुंबई - मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. डब्यांच्या लोकप्रियतेमुळे मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून हे डबे सुरू केले. १५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई-पुणे मार्गावर आणखी दोन व्हिस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला जोडण्यात आले. २०२१ आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये २५ जुलैपासून तसेच पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये १० ऑगस्ट २०२२ पासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला.
एक्स्प्रेस प्रवासी संख्या
मुंबई-पुणे-मुंबई प्रगती ३०,९८१ प्रवासी
मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन ३१,१६२ प्रवासी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी ३०,७५८ प्रवासी
डेक्कन क्वीन २९,७०२ प्रवासी
पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी २४,२७४ प्रवासी
तेजस २९,५२७ प्रवासी
मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस ७.६८ कोटी उत्पन्न
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेसचे उत्पन्न ६.१६ कोटी
पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेसचे उत्पन्न ४.९८ कोटी.
मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन २.७२ कोटी.
मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसचे उत्पन्न २.६० कोटी.
मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस २.३५ कोटी
हे आहे वैशिष्ट्य
व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छतासोबतच रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लायडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे, सिरॅमिक टाइल्स फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्ये असून व्ह्यूइंग गॅलरी आहे.