लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सरकारी बँकएसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. तुमच्या बचत खात्यात पैसे नसल्यामुळे एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास, २० रुपयांचा दंड व जीएसटी भरावा लागेल.
ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ओलांडली तर प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी २३ रुपये मोजावे लागतील. ज्यांच्या बँक खात्यात १ लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक शिल्लक आहे त्यांना एसबीआय आणि इतर बँकेच्या एटीएममधून अमर्यादित व्यवहार करता येणार आहे. याचा अर्थ एटीएममधून प्रत्येक वेळी पैसे काढल्यावर त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.