सव्वालाखाची वीजचोरी पकडली
By Admin | Updated: August 27, 2014 00:14 IST2014-08-27T00:14:45+5:302014-08-27T00:14:45+5:30
वीज चोरीविरोधात महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या सफाळे विभागाने धडक मोहीम हाती घेतली

सव्वालाखाची वीजचोरी पकडली
केळवे-माहिम : वीज चोरीविरोधात महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या सफाळे विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून ग्रामीण भागातील एडवण खार्डी विभागात महिनाभरात वीज चोरांना पकडून कंपनीने त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
विद्युत वितरण कंपनीच्या सफाळे उपविभागातंर्गत वीज चोरीला आळा बसावा यासाठी चालू केलेल्या मोहिमेतंर्गत एडवण खार्डी परिसरातील सहा ग्राहकांना वीज तारेवर आकडा टाकून वीज चोरी करताना पकडले आहे. या सर्वावर वीज चोरी नियम १३५ व १२६ अंतर्गत कारवाई करुन एक लाख वीस हजारांची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. सफाळे विभागातील ही वीज चोरी विरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून वीज चोरीवर आळा बसण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे सफाळे विभागाचे उपकार्यकारी अभियंता मनीष वाघेला यांनी सांगितले. (वार्ताहर)