मुंबईतल्या रोपट्यांना वाचवतेय हिरवी जाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:40 AM2018-06-27T01:40:46+5:302018-06-27T01:40:48+5:30

समुद्रकिनाऱ्याजवळील काही ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण भौगालिक परिस्थितीमुळे समुद्राच्या लाटा अधिक जोरात फुटतात.

Saves the plants in Mumbai, the green mesh | मुंबईतल्या रोपट्यांना वाचवतेय हिरवी जाळी

मुंबईतल्या रोपट्यांना वाचवतेय हिरवी जाळी

मुंबई : समुद्रकिनाऱ्याजवळील काही ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण भौगालिक परिस्थितीमुळे समुद्राच्या लाटा अधिक जोरात फुटतात. लाटा फुटल्यानंतर उडणारे पाण्याचे तुषार वाहत्या वाºयासोबत उडतात. या उडणाºया तुषारांना सॉल्ट स्प्रे असे म्हटले जाते. या सॉल्ट स्प्रेचा अत्यंत प्रतिकूल परिणाम नुकतेच मूळ धरू पाहणाºया छोट्या रोपट्यांवर होत असतो. हे लक्षात घेऊन नेताजी सुभाष मार्गावरील (मरिन ड्राइव्ह) दुभाजकांवर लावण्यात आलेल्या १२० शोभेच्या झाडांना वैशिष्ट्यपूर्ण हिरवी जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत.
रोपट्यांच्या पानांवर सॉल्ट स्प्रेमधील मीठ साचते. याच मिठावर पावसाचे पाणी पडले की, ते मीठयुक्त पाणी झाडांच्या पानातून व मुळातून शोषले जाते, ज्याचा विषासारखा परिणाम रोपट्यांवर होतो. ज्यामुळे झाडांची रोपटी अशा वातावरणात तग धरत नाहीत. पर्यावरणाचे संवर्धन आणि सुशोभीकरण या दोन प्रमुख उद्देशांनी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी झाडे लावली जातात. याच अंतर्गत रस्त्यांवरील दुभाजकांमध्येही झाडांची रोपटी लावली जातात. मात्र, समुद्रकिनाºयाजवळ अशी रोपटी लावताना, ती रोपटी सॉल्ट स्प्रेच्या टप्प्यात येत असतील, तर त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. ज्या झाडांना जाळी गुंडाळण्यात आली आहे, त्यांच्यावर सॉल्ट स्प्रेचा प्रतिकूल परिणाम अत्यंत कमी होत आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
दक्षिण मुंबईतील नेताजी सुभाष मार्गावरील (मरिन ड्राइव्ह) पोलीस जिमखान्यासमोरील समुद्रकिनाºयाचा भाग हा सॉल्ट स्प्रेचा टप्पा आहे. त्यामुळे या परिसरातील झाडांची आणि विशेषकरून छोट्या रोपट्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. मरिन ड्राइव्ह पोलीस जिमखान्यासमोरील वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाºयामुळे पावसाळ्यादरम्यान अधिक वेगाने येणाºया लाटा आणि अधिक वेगाने वाहणारे वारे, याच्या एकत्रित परिणामामुळे समुद्राच्या लाटादेखील अधिक वेगाने येऊन या ठिकाणच्या किनाºयावर फुटतात. त्यामुळे या ठिकाणी समुद्राच्या खाºया पाण्याचे सूक्ष्म तुषार म्हणजेच सॉल्ट स्प्रे मोठ्या प्रमाणात तयार होऊन ते वाºयासोबत जवळपासच्या परिसरात पसरतात. ज्यांचा प्रतिकूल परिणाम झाडांवर होत असल्याचे, तसेच सॉल्ट स्प्रेच्या माºयापुढे झाडांची रोपटी माना टाकत असल्याचेही महापालिकेच्या उद्यान विभागाच्या यापूर्वी निदर्शनास आले होते.
यावर उपाय म्हणून गेल्या वर्षी झाडांच्या रोपट्यांना प्रायोगिक स्वरूपात हिरवी जाळी बसविण्यात आली होती. या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर, या वर्षी सॉल्ट स्प्रेच्या टप्प्यातील १२० झाडांना हिरवी जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीमुळे सॉल्ट स्प्रेचा रोपट्यांवर होणारा प्रतिकूल परिणाम कमी झाला आहे, अशीही माहिती परदेशी यांनी दिली आहे.

Web Title: Saves the plants in Mumbai, the green mesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.