सावरकर स्मारक सहसंयोजक विश्व मराठी संमेलन

By Admin | Updated: August 19, 2015 01:23 IST2015-08-19T01:23:55+5:302015-08-19T01:23:55+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते अंदमान येथे होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात सहसंयोजक म्हणून

Savarkar Memorial Covalent World Marathi Conference | सावरकर स्मारक सहसंयोजक विश्व मराठी संमेलन

सावरकर स्मारक सहसंयोजक विश्व मराठी संमेलन

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते अंदमान येथे होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात सहसंयोजक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला सहभागी होण्याची मान्यता दिली आहे. त्याचा स्वीकार स्मारकाच्या वतीने कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी केला आहे. याबाबतचे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे व कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी स्मारकाला पाठविले आहे.
सावरकरांचे यंदाचे हे ५०वे आत्मार्पण वर्ष असून देशभर कार्यक्रम करण्याचे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने अंदमान येथील चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केले. अधिकाधिक साहित्यप्रेमी तसेच सावरकर भक्तांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन रणजीत सावरकर यांनी केले आहे.

Web Title: Savarkar Memorial Covalent World Marathi Conference