सत्यप्रकाशचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: July 16, 2015 03:59 IST2015-07-16T03:59:24+5:302015-07-16T03:59:24+5:30
वर्षा सहलीसाठी मुंबईतील सांताक्रूझ आग्रीपाडा येथील सोळा जणांच्या ग्रुपमधील सत्यप्रकाश कुडतरकर याचा मृतदेह रेवदंडा पोलिसांच्या हाती तब्बल ७२

सत्यप्रकाशचा मृतदेह सापडला
बोर्ली-मांडला : वर्षा सहलीसाठी मुंबईतील सांताक्रूझ आग्रीपाडा येथील सोळा जणांच्या ग्रुपमधील सत्यप्रकाश कुडतरकर याचा मृतदेह रेवदंडा पोलिसांच्या हाती तब्बल ७२ तासांनी लागला. मृतदेह शोधण्यासाठी तटरक्षक दलाच्या जवानांची मोलाची मदत झाली.
सत्यप्रकाश कुडतरकर हा रविवारी (१२ जुलै) दुपारी मित्रांसोबत फणसाड धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो अचानक पाण्यात बेपत्ता झाला होता. त्याचा शोध रविवारपासून सुरू होता. मात्र बुधवारी सकाळी भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी आबासाहेब पाटील यांनी पाचारण केले होते. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेवून फणसाड धरणाच्या परिसर पिंजून काढत सत्यप्रकाशचा मृतदेह शोधण्यात यश मिळविले आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्रात करून कुटुंबीयांकडे दिला.