रायगडमध्ये संततधार
By Admin | Updated: September 5, 2014 23:10 IST2014-09-05T23:10:12+5:302014-09-05T23:10:12+5:30
गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्हय़ात पावसाची संततधार सुरू आहे.

रायगडमध्ये संततधार
अलिबाग : गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्हय़ात पावसाची संततधार सुरू आहे. सतत कोसळणा:या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे गौरी-गणपतीचे विसजर्न करून परतणा:या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.
रायगड जिल्हय़ात गेल्या चोवीस तासात 36.25 मि.मी. पाऊस झाला असला तरी आज सकाळपासून मोठय़ाप्रमाणात पाऊस झाल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. तसेच अनेक ठिकाणच्या बाजारपेठांत पावसामुळे शुकशुकाट पसरला होता. तसेच संततधार पावसामुळे गौरी-गणपती विसजर्नानंतर आज मुंबईस परतणा:या कोकणातील चाकरमान्यांना गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाऊस एक अडसर ठरला. महामार्गावरील खड्डय़ांत पावसाचे पाणी साचल्याने खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने महामार्गावरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती.
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत रायगडमध्ये पेण येथे 53.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित ठिकाणी महाड-5क्,खालापूर-45, पोलादपूर-43, तळा-42.5, कजर्त-4क्.5, श्रीवर्धन-4क्, सुधागड-38, म्हसळा-37.6, मुरुड-34, रोहा-3क्,उरण-29, माणगांव-23, पनवेल-19, अलिबाग-11 आणि माथेरान येथे 44 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)
मोहोपाडा, रसायनीत मुसळधार पाऊस
रसायनी : पहाटेपासूनच रसायनी व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून पाताळगंगा दुथडी भरून वाहत आहे, तर मोहोपाडा बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले होते.
रेवदंडा : गेल्या दोन दिवसांपासून रेवदंडा परिसरातील पावसाचा जोर वाढला आहेत. त्यातच गुरुवारी गौरी - गणपतीचे विसर्जन झाल्यावर चाकरमानी परतीच्या मार्गावर आहेत. पण सतत कोसळणा:या पावसामुळे रस्त्यावर थोडय़ाफार प्रमाणात वाहतूक कोंडीचे चित्र होते. तर बसस्थानकात परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्याची मोठी गर्दी केली आहे. वादळी वारा आणि उसळणा:या लाटांमुळे मासेमारी ठप्प झाली आहे. तर पावसाने नारळ पाडण्याचे काम होऊ शकलेले नाही.
पनवेल परिसरात दमदार हजेरी
1 पनवेल - पनवेल परिसरात शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावीत परिसराला झोडून काढले. जिकडेतिकडे पाणीच पाणी झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. पनवेल शहरात कोळीवाडा परिसरात काही घरात पाणी शिरल्याचे वृत्त आहे. सायंकाळर्पयत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नव्हती.
2आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपार्पयत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. त्याचबरोबर शहरातील बाबन बंगला, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल, हरीओम नगर, टपाल नाका, उरण नाका या ठिकाणी रस्त्यावर एक फुटापेक्षा जास्त पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा होत होता. इलेव्हेंडेट रोडखाली अमरधाम स्मशानभूमीजवळ सव्र्हिस रोडवर पाणी साचले.
3नवीन पनवेल परिसरातील एचडीएफसी सर्कल, बांठिया हायस्कूलजवळ रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. खांदा वसाहतीत शिवाजी चौकात पाणी साचले होते. त्याचबरोबर नालेही दुथडी भरून वाहत होते. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने गाढी आणि पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. कळंबोलीत अनेक सेक्टरमध्ये दीड फूट पाणी साचले होते. त्याचबरोबर सिडकोने पावसाच्या पाण्यासाठी काढलेले चॅनेल पाणी भरून वाहत होते. मुंबई- पुणो, मुंबई- गोवा, एनएच4बी, पनवेल -सायन त्याचबरोबर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती.