छत टाकण्यासाठी सॅटीस उद्यापासून बंद

By Admin | Updated: May 30, 2015 22:31 IST2015-05-30T22:31:44+5:302015-05-30T22:31:44+5:30

ठाणे स्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या सॅटीसवर आता छत टाकण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे.

Satis to be closed from the roof to the ground | छत टाकण्यासाठी सॅटीस उद्यापासून बंद

छत टाकण्यासाठी सॅटीस उद्यापासून बंद

ठाणे : ठाणे स्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या सॅटीसवर आता छत टाकण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. ते घालतांना कोणत्याही स्वरुपाचा अपघात होऊ नये म्हणून आता १ जूनपासून येथे असलेले बसथांबे इतरत्र हलविण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला आहे. तब्बल १ महिना हे काम सुरु राहणार असल्याने आता प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत.
या कामामुळे येत्या १ जूनपासून लोकमान्यनगर, किसननगर, श्रीनगर, गुरुकुल सोसायटी, वागळे आगार, काजूवाडी, लोकमान्यनगर (नितिन कंपनी, इंदिरानगर मार्गे), कोकणीपाडा (पोखरण रोड नं. २) या मार्गावर धावणाऱ्या बस आता सॅटीस वाहतूक नियंत्रण चौकी येथून सुटणार आहेत. तर शास्त्रीनगर, शिवाईनगर, उपवन, भीमनगर, येऊर आणि लक्ष्मीपार्क या मार्गावर धावणाऱ्या बस ठाणे (पूर्व) कोपरी येथून सुटणार आहेत. परंतु कोपरी येथील स्थानकाची जागा आधीच अपुरी असल्याने हे बसथांबे तेथे येत असल्याने या भागावर पुन्हा ताण वाढणार असून या भागात वाहतूककोंडीत आता आणखी भर पडणार आहे.
माजिवडा, बाळकूम (दादलानी पार्क), कोलशेत, मनोरमा नगर, ढोकाळी नाका, एव्हरेस्ट वर्ल्ड या मार्गावर धावणाऱ्या बसेसचा थांबा आता चेंदणी कोळीवाडा येथे स्थलांतरीत करण्यात आला असून, वृंदावन सोसायटी, ऋुतुपार्क, राबोडी (कुरेशी चौक), कळवा, खारेगांव, सह्याद्री सोसायटी, पारसिकनगर (रेतीबंदर सर्कल), रघुकुल सोसायटी, राबोडी पंचगंगा, अंजूर अलीमघर, पवारनगर, तुळशीधाम, वाघबीळ, पातलीपाडा, आझादनगर, ब्रम्हांड धर्माचापाडा, कासारवडवली, टिकुजिनीवाडी - मानपाडा, गायमुख, ओवळा, मिरारोड या मार्गावर धावणाऱ्या बस सॅटीसवरील टोव्हींग व्हॅनसाठी असलेल्या मोकळ्या जागेतून सुटणार आहेत. १ जून पासून हा बदल अमलात येणार असून, हे छत घालण्यासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी जाणार असल्याने तोपर्यंत सॅटीस ब्लॉक असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Satis to be closed from the roof to the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.