सरनाईक पितापुत्र ईडीच्या चौकशीला गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:20 AM2020-12-04T04:20:24+5:302020-12-04T04:20:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावून गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास ...

Sarnaik father-son absent from ED's inquiry | सरनाईक पितापुत्र ईडीच्या चौकशीला गैरहजर

सरनाईक पितापुत्र ईडीच्या चौकशीला गैरहजर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावून गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले हाेते. मात्र ते गैरहजर राहिले. त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याचीही गैरहजेरी कायम होती.

एमएमआरडीएच्या सुरक्षा रक्षक घोटाळ्याप्रकरणी टॉप्स ग्रुप आणि विहंग ग्रुप यांच्यातील आर्थिक व्यवहाराच्या तपासणीसाठी ईडीकडून विहंग सरनाईक यांना ४ ते ५ वेळा समन्स बजावण्यात आले. मात्र ते चौकशीला हजर राहिले नाहीत. गुरुवारीही त्यांची गैरहजेरी कायम होती तर आमदार प्रताप सरनाईक यांनी ते विलगीकरणात असल्याने पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्याने त्यांनाही पुन्हा समन्स बजावत गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नाहीत.

...................................

Web Title: Sarnaik father-son absent from ED's inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.