सरळगाव चार दिवस अंधारात

By Admin | Updated: October 10, 2014 23:33 IST2014-10-10T23:33:40+5:302014-10-10T23:33:40+5:30

विद्युत मंडळाच्या सावळ्या गोंधळाचा फटका सरळगाव परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसत असून दोन वर्षांपासून सातत्याने अघोषित भारनियमन होते आहे.

Saregaon for four days in darkness | सरळगाव चार दिवस अंधारात

सरळगाव चार दिवस अंधारात

टोकावडे : विद्युत मंडळाच्या सावळ्या गोंधळाचा फटका सरळगाव परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसत असून दोन वर्षांपासून सातत्याने अघोषित भारनियमन होते आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने विजेचे खांब पडल्याने नागाव, कान्हार्ले, डांगुर्लेसह या परिसरातील गावे चार दिवसांपासून अंधारात आहेत.
सध्या परीक्षा सुरू असून यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. याचा फटका सरळगाव येथील कृषी महाविद्यालयालाही बसला आहे. वादळी पावसाने पोल पडले आहेत. याबाबत, विद्युत मंडळाकडे तक्रार करूनसुद्धा
याची दखल घेतली जात नाही. (वार्ताहर)

Web Title: Saregaon for four days in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.