सारस्वस्त बँकेची घोडदौड
By Admin | Updated: July 29, 2015 03:32 IST2015-07-29T03:32:54+5:302015-07-29T03:32:54+5:30
सहकारी क्षेत्रातील सारस्वत बँकेने २०१४-१५ या आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी करत यशस्वी वाटचाल केली आहे. सारस्वत बँकेने ५० हजार कोटींची व्यवसायपूर्तीच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे.

सारस्वस्त बँकेची घोडदौड
मुंबई : सहकारी क्षेत्रातील सारस्वत बँकेने २०१४-१५ या आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी करत यशस्वी वाटचाल केली आहे. सारस्वत बँकेने ५० हजार कोटींची व्यवसायपूर्तीच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे. बँकेच्या ९७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचा आर्थिक ताळेबंद जाहीर करण्यात आला आहे.
बँकेचा व्यवसाय १४.११ टक्क्यांनी वाढून मार्च २०१५ अखेरीस ४४,९६८.९६ कोटींवर पोहोचला आहे. एकूण ठेवींचे प्रमाण १३.५० टक्क्यांनी वाढून २७,१७०.८४ कोटी तर एकूण कर्जांचे प्रमाण १५.०५ टक्क्यांनी वाढून १७,७९८.१२ कोटींवर पोहोचले आहे. या कालावधीत बँकिंग क्षेत्रांचे ठेवींचे प्रमाण ११.८५ टक्के तर कर्जांचे प्रमाण १०.१६ टक्के इतके होते. चालू व बचत खात्यांमधील ठेवी या ७१६.९२ कोटींनी वाढून, एकूण ठेवींशी हे प्रमाण २४.७३ टक्के असे आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात २९.२९ टक्क्यांनी भर पडून गेल्या वर्षीच्या १४७.०९ कोटींवरून तो १९०.१८ कोटींवर पोहोचला आहे. बँकेने आपल्या भागधारकांना १५ टक्के लाभांश जाहीर केला आहे, तो गेल्या वर्षीपेक्षा ५ टक्क्यांनी जास्त आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाणही १२.११ टक्क्यांवरून ३१ मार्च २०१५ अखेरीस १२.५७ टक्के असे सुदृढ झाले आहे. सारस्वत बँकेच्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि नवी दिल्ली या राज्यांत एकूण २६७ शाखा असून येत्या वर्षात अजून नवीन २० शाखा उघडणार आहे. (प्रतिनिधी)