सोनसाखळी चोराला अटक
By Admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:21+5:302014-09-11T22:31:21+5:30
सोनसाखळी चोराला अटक

सोनसाखळी चोराला अटक
स नसाखळी चोराला अटकमुंबई : वाकोला पोलिसांनी एका सोनसाखळी चोराला गुरुवारी सकाळी वाकोला परिसरातून अटक केली आहे. अब्दुल रेहमान इक्बाल हुसेन शेख (२१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अब्दुल हा सांताक्रूजमधील दालन नगर, ग्रीन गार्डन परिसरात राहतो. तो व त्याचा साथीदार सकाळी दुचाकीवरून सोनसाखळी चोरी करण्यास वाकोला येथे आला होता. वाकोला येथील कालामाता मंदिरासमोर सोवानगर बस स्टॉपवर सरस्वती वाळवेकर उभ्या होत्या. त्यावेळी अब्दुलने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. त्यावेळी त्यांनी आरडाओरड करताच स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)