Join us  

संजीव कुमार यांनी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली; आर्थिकस्थिती बळकट करण्यास प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 3:05 AM

संजय कुमार यांच्याकडील गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास व अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांनी मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून मंगळवारी पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून राज्याची आर्थिकस्थिती बळकट करण्यास आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले.संजय कुमार यांच्याकडील गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास व अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संजय कुमार हे प्रशासकीय सेवेच्या १९८४ च्या बॅचचे असून, ३६ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. अमरावतीचे सहायक जिल्हाधिकारी, बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर ते म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून राज्य प्रशासन कोरोना संकटाचा यशस्वी मुकाबला करीत आहे. पावसाळ्यात रोगराईचे प्रमाण वाढू नये, यासाठी उपाय हाती घेण्यात येतील.

टॅग्स :अजोय मेहता