Join us  

ED च्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, गाण्यातून व्यक्त केली भावना

By महेश गलांडे | Published: December 27, 2020 7:58 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

ठळक मुद्देराऊत यांनी एका चित्रपटातील गाण्याच्या ओळी दोन ओळी शेअर करत, बघुयात कुणामध्ये किती दम आहे? असं आव्हानच एकप्रकारे भाजपाला दिलंय. आ देखे जरा किसमे, कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया... असं राऊत यांनी म्हटलंय. 

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, असे संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. मात्र, आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन संजय राऊत यांनी गाण्याच्या ओळी शेअर केल्या आहेत. 

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. आता, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात माध्यमांत वृत्त येताच खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राऊत यांनी एका चित्रपटातील गाण्याच्या ओळी दोन ओळी शेअर करत, बघुयात कुणामध्ये किती दम आहे? असं आव्हानच एकप्रकारे भाजपाला दिलंय. आ देखे जरा किसमे, कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया... असं राऊत यांनी म्हटलंय. 

संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचं दिसून येत आहे. कारण, गेल्या 2 दिवसांत महाविकास आघाडीतील 2 नेत्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. आता, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. मात्र, मला याची काहीही कल्पना नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देतो, असेही संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलंय. 

खडसे बुधवारी हजर होणार

भोसरी येथील भूखंड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय(ईडी)कडून शनिवारी आपल्याला नोटीस प्राप्त झाली आहे. ३० डिसेंबरला मुंबईतील ईडी कार्यालयात बोलाविण्यात आले असून चौकशीत आपण सर्व सहकार्य करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी माध्यमांना दिली. या प्रकरणात ही पाचवी चौकशी असल्याचे त्यांनी सांगितले. भोसरी येथील भूखंड हा पत्नी मंदाकिनी यांनी खरेदी केला असून एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित माझ्या नावाने ही नोटीस आली असेल, असेही खडसे म्हणाले.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाअंमलबजावणी संचालनालय