Join us  

संजय राऊत अन् परतीचा पाऊस, थांबायचं नावच घेईनात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 6:26 AM

महायुतीच्या महाघोळाची सोशल मीडियात खिल्ली

मुंबई : शिवसेना : ‘हमारे पास सत्ता बनाने का प्लॅन ए, बी और सी है, आप के पास क्या है? अमित शहा : हमारे पास प्लॅन ईडी है’ या आणि अशा अनेक गमतीजमतींची सोशल मीडियावर सध्या अक्षरश: धूम सुरू आहे. ‘पेरले वावर, पीकही करपले, सत्तेसाठी चाले घासाघिस’ अशा कवितेतून सत्तेच्या पोरखेळाबद्दलची नाराजीही व्यक्त होत आहे.

शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत हे टीका वा समर्थनाच्या अंगाने सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहेत. ‘अवकाळी पावसामुळे शेतीचं अन् राऊतांमुळे युतीचं काही खरं नाही’, ‘संजय राऊत अन् परतीचा पाऊस...! थांबायचं नाव घेईना’, अशी खिल्लीही उडविली जात आहे. ‘सध्या बाजारात आले आहेत संत्री, तुमचं ठरेपर्यंत मी बनू का मुख्यमंत्री?, असा सवाल करणारी पोस्ट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंंच्या फोटोसह धुमाकूळ घालत आहे.

तिशीतल्या युवा नेत्याला, तुमच्या मनाप्रमाणे मुख्यमंत्री होऊ द्यापण थोडी ब्रेकिंग न्यूज पावसातसडलेल्या शेतमालाचीही होऊ द्या’- असा टोकदार सल्ला चॅनेलवाल्यांना देत महायुतीच्या महाघोळाच्या बातम्या देताना शेतीच्या नुकसानीची बातमी दुय्यम झाली असल्याचा रागही व्यक्त होत आहे. ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघितल्याशिवाय मी जाणार नाही.मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन - पाऊस’ असे ढगातून सांगणाऱ्या पावसाचे कार्टूनही चांगलेच व्हायरल झाले आहे.सुपरफास्ट फिरत असलेल्या काही पोस्टच्लवकर मिटवा रे बाबांनो...कधी एकदा १० रुपयांत पोटभर जेवतोय असं झालंय - घरदार सोडून रुमवर राहणाऱ्यांची संघटना.च्इतकाही वेळ लावू नका हो, नाही तर लोकांच्या लक्षात येईल...च्धृतराष्ट्र भले आंधळा होता पण युद्धात काय करावं यापेक्षा रणभूमीवर काय घडतंय एवढंच संजयला विचारायचा.च्दुबईत दाऊद, मुंबईत राऊत.

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीसशिवसेना