Join us

‘कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर संजय दत्तवर परदेशात उपचार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 04:40 IST

याबद्दल आम्ही नेहमीच तुमचे आभारी आहोत. मी संजूच्या सर्व चाहत्यांचे व हितचिंतकांचे आभार मानते.

मुंबई : अभिनेता संजय दत्त आता मुंबईत उपचार घेणार आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर पुढील उपचारासाठी आम्ही परदेशात जाणार आहोत अशी माहिती संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने दिली. तिने म्हटले, संजूने त्याच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. पण तुमच्या प्रेमाने त्याला प्रत्येक कठीण काळात खूप धैर्य दिले. याबद्दल आम्ही नेहमीच तुमचे आभारी आहोत. मी संजूच्या सर्व चाहत्यांचे व हितचिंतकांचे आभार मानते.अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजमधील फुप्फुसाचा कर्करोग झाला आहे. बुधवारी त्याची पत्नी मान्यताने निवेदन जाहीर केले. सध्या संजू कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्यावर सर्वोत्तम डॉक्टर उपचार करत आहेत. मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करते की त्याच्या आजारपणाबद्दल कोणत्याही प्रकारचे अंदाज लावणे आणि अफवा पसरवणे थांबवा आणि डॉक्टरांना त्यांचे काम करू द्या. आम्ही आपल्याला त्याच्या प्रकृतीबाबत सतत माहिती देत राहू, असे मान्यता यांनी निवेदनात म्हटले.

टॅग्स :संजय दत्त