पाण्याऐवजी प्यायले सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST2021-02-05T04:26:35+5:302021-02-05T04:26:35+5:30

शिक्षण अर्थसंकल्प सादर करतेवेळी अनवधानाने घडला प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोना महामारीच्या संकटानंतर सादर ...

Sanitizer to drink instead of water | पाण्याऐवजी प्यायले सॅनिटायझर

पाण्याऐवजी प्यायले सॅनिटायझर

शिक्षण अर्थसंकल्प सादर करतेवेळी अनवधानाने घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोना महामारीच्या संकटानंतर सादर करण्यात आलेला मुंबई महापालिकेचा पहिलाच अर्थसंकल्प बुधवारी जाहीर करण्यात आला. या दरम्यान शिक्षण अर्थसंकल्प सादर करतेवेळी सहआयुक्त रमेश पवार यांनी पाणी समजून सॅनिटायझर प्यायल्याचा प्रकार अनवधानाने घडला. यानंतर रमेश पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारणा करण्यात आली असता ती व्यवस्थित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शिक्षण अर्थसंकल्प सादर करतेवेळी सहआयुक्त (शिक्षण) आशुतोष सलील तब्येत ठीक नसल्याने गैरहजर होते, त्यामुळे शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सहआयुक्त रमेश पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. एरव्ही भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी अर्थसंकल्प सादर करीत असतात. बुधवारी अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळालेले पवार हे महापालिकेचे पहिलेच अधिकारी ठरले आहेत. सवयीप्रमाणे सहआयुक्तांनी समोर ठेवलेल्या बाटलीतील पाण्याचा घोट घेतला आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की, ते पाणी नसून आपण सॅनिटायझरचा घोट घेतला आहे. त्यांची चांगलीच धांदल उडाली. झालेला प्रकार त्यांच्या मागे उभे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी पवारांना अडवले. झालेल्या प्रकारामुळे बाजूला बसलेल्या संध्या दोषीही घाबरून गेल्या असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर पवारांनी पाण्याचा घोट घेतला आणि त्वरित सभागृहाबाहेर जाऊन चूळ भरली आणि पुन्हा सभागृहात येऊन शिक्षण अर्थसंकल्प सादर केला.

कोट

अनवधानाने हा प्रकार घडला असला तरी आता माझी प्रकृती ठीक आहे. दोन्ही बाटल्या एकाच ठिकाणी ठेवल्याने नकळत हा प्रकार घडला.

रमेश पवार, सहआयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका

Web Title: Sanitizer to drink instead of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.