वाळू माफियांनी बदडले तलाठी आणि पोलिसाला

By Admin | Updated: March 25, 2015 23:05 IST2015-03-25T23:05:41+5:302015-03-25T23:05:41+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन निरनिराळ्या घटनांमध्ये रेतीव्यवसायीकांच्या कर्मचाऱ्यांनी तलाठी व वाहतूक पोलीसांना चांगलेच बदडले.

Sandeep Mophiyanii Talathi and Polisa | वाळू माफियांनी बदडले तलाठी आणि पोलिसाला

वाळू माफियांनी बदडले तलाठी आणि पोलिसाला

वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन निरनिराळ्या घटनांमध्ये रेतीव्यवसायीकांच्या कर्मचाऱ्यांनी तलाठी व वाहतूक पोलीसांना चांगलेच बदडले. तसेच एका प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पैसे घेतल्यानंतरही पोलीसांनी गाडी अडवल्याचा राग आलेल्या ट्रकवरील कर्मचाऱ्यांनी पोलीसांना बदडून काढले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत कण्हेर पोलीस चौकीच्या हद्दीत रेतीव्यवसायीकांचा दिवसभर सुळसुळाट असतो. खार्डी येथील रेतीस्थळावर रेती भरून ट्रक निघाला की हे रेतीव्यवसायीक आपल्या गाड्या मागे लावून संरक्षण देत असतात. या गाड्यांची प्रतिक्षा करत व्यवसायीकांच्या अनेक गाड्या कण्हेर पोलीस चौकीच्या बाजुला उभ्या असतात. अनेक रेतीव्यवसायीक या चौकीत वामकुक्षी करत असताना पाहायला मिळतात. दररोज लाखो रू. ची चा मलीदा पोलीसांना देत असल्यामुळे हे रेतीव्यवसायीक चांगलेच निर्ढावले आहेत. त्याचा अनुभव कालच्या या दोन घटनांवरून महसूल व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना आला. पैसे घेऊनही गाडी अडवत असल्याचा राग येऊन ट्रकचालकांनी पोलीसांना मारहाण केली. तर दुसऱ्या एका प्रकरणात ट्रकच्या मागे स्वत:ची गाडी लावणाऱ्या व्यवसायीकाने थेट महसूल विभागाच्या गाडीसमोरच आपली गाडी आडवी उभी केली. त्यामुळे प्रचंड वादावादी होऊन धक्काबुक्की झाली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या आहेत. एका प्रकरणातील आरोपी गजाआड झाले आहेत. (प्रतिनिधी)

४एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पैसे घेतल्यानंतरही गाडी अडवल्याचा राग आल्याने ट्रकवरील रेतीव्यवसायीकांच्या कर्मचाऱ्यांनी पोलीसांना बदडून काढले.

Web Title: Sandeep Mophiyanii Talathi and Polisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.