शवविच्छेदन केंद्रासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

By Admin | Updated: May 22, 2014 03:30 IST2014-05-22T03:30:52+5:302014-05-22T03:30:52+5:30

लालफितीच्या कारभारात अडकलेले गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमधील शवविच्छेदन केंद्र लवकर सुरू करण्यात यावे,

In the sanctification of the civil movement for the dissection center | शवविच्छेदन केंद्रासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

शवविच्छेदन केंद्रासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

मनोहर कुंभेजकर, मुंबई - लालफितीच्या कारभारात अडकलेले गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमधील शवविच्छेदन केंद्र लवकर सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी येत्या ३0 मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पश्चिम उपनगरात शवविच्छेदनाची कमतरता भासत असतानाच मुंबई पालिकेने गोरेगाव (प) येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केंद्रासाठी लागणारी सर्व यंत्रणा उभी करून राज्य शासनाच्या गृहखात्याकडे एक वर्षापूर्वी हस्तांतरित केले होते. मात्र शासनाच्या सार्वजानिक आरोग्य खात्याने या केंद्रासाठी लागणारे ४ डॉक्टर आणि २५ कर्मचारीवर्ग उपलब्ध केला नाही. हे केंद्र पालिकेने गृहखात्याकडे हस्तांतरित करूनही ते शासनाच्या सार्वजानिक आरोग्य खाते आणि गृहखात्याच्या लालफितीत अडकल्याने सुरू होत नसून येथील यंत्रसामग्री धूळ खात पडल्याचा आरोप शिंदे यांनी केला. पश्चिम उपनगरांत महापालिकेचे विलेपार्ले (प) येथील कूपर आणि बोरिवली (प) येथील भगवती हॉस्पिटल येथे दोनच शवविच्छेदन केंद्रे कार्यान्वित आहे. सिद्धार्थ हॉस्पिटलमधील या केंद्राचा फायदा जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड येथील नागरिकांना होणार आहे. शासनाच्या ९ जुलै १९९९ च्या आदेशान्वये मुंबईत १४ ठिकाणी शवविच्छेदन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोरिवली येथील भगवती हॉस्पिटलमध्ये २00३ साली शवविच्छेदन केंद्र सुरू करण्यात आले. नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी सांगितले की, याबाबत आपण पालिका प्रशासनाशी पाठपुरावा करून पालिकेचा निधी उपलब्ध करून दिला. सिद्धार्थ हॉस्पिटलच्या आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांना शवविच्छेदन केंद्राचा त्रास होऊ नये, म्हणून या हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवली. सिद्धार्थ हॉस्पिटल आणि शवविच्छेदन केंद्रामध्ये संरक्षक भिंत उभारली. मृतदेह ठेवण्यासाठी वॉक-इन कुलर बसवण्याची व्यवस्था केली. याबाबत सहपोलीस आयुक्त, पालिका आयुक्त यांच्याशी आपण सतत संपर्क साधला. मात्र हे केंद्र अजून सुरू होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नागपाडा येथील पोलीस शल्यचिकित्सक डॉ. एस.एम. पाटील यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी सांगितले की, या शवविच्छेदन केंद्रासाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सार्वजनिक आरोग्य खात्याने आमच्या गृहखात्याला उपलब्ध करून दिलेली नाहीत. ही रिक्त पदे उपलब्ध करून दिल्यावरच हे शवविच्छेदन केंद्र सुरू होऊ शकेल.

Web Title: In the sanctification of the civil movement for the dissection center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.