सांबाच्या लाचखोर अभियंत्याला अटक

By Admin | Updated: December 24, 2014 22:43 IST2014-12-24T22:43:34+5:302014-12-24T22:43:34+5:30

जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता सचिन जाधव याला १० हजारांची लाच घेतांना मंगळवारी रंगहाथ पकडले आहे.

Sanba's bribe engineer arrested | सांबाच्या लाचखोर अभियंत्याला अटक

सांबाच्या लाचखोर अभियंत्याला अटक

जव्हार : पालघर जिल्ह्याची निर्मीती होऊन नुकत्याच सुरू झालेल्या लाचलुचपत विभागाने पहिलीच कारवाई करून जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता सचिन जाधव याला १० हजारांची लाच घेतांना मंगळवारी रंगहाथ पकडले आहे.
मंगळवार सायंकाळी उशीरा पर्यत त्यांची तपासणी सुरू होती, त्यान नंतर रात्री उशीरा जव्हार पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरूध्द भा.द.वि.स. कलम ७, १३ (१) (ड), सह १३ (२) असे कलम लावण्यात आले असुन पालघर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष न्यायालय सुरू न झाल्यामुळे त्याची रवानगी थेट ठाणे येथे करण्यात आली असून त्याला दि. २७ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी दिल्याची माहिती पालघर लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय अफाळे यांनी दिली.
एका बांधकाम ठेकेदाराने राहिलेली बिले काढण्यासाठी सां.बा.विभागाचे कनिष्ठ अभयिंता सचिन जाधव यांचे कडे तगादा लावला असता, जाधव यांनी या रकमेची मागणी केली होती.

Web Title: Sanba's bribe engineer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.