Join us
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसाला सायन पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 02:38 IST

पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या ३८ वर्षांच्या इरफान छोटे खान शेख (३८) याला सायन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या ३८ वर्षांच्या इरफान छोटे खान शेख (३८) याला सायन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी तो सायन रुग्णालयात संशयास्पद फिरताना दिसला. सीसीटीव्हीमध्ये त्याच्या संशयास्पद हालचाली सुरक्षारक्षकांनी हेरल्या. त्याने सुरुवातीला स्वत:जवळील विश्वनाथ राणे नावाचे पोलीस शिपाई असल्याचे ओळखपत्र दाखवून प्रवेश केला. प्रत्येक वॉर्डबाहेर तो फिरत होता. अखेर सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेत सायन पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा त्याच्याकडील ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. शेख हा धारावीचा रहिवासी असून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :पोलिस