सना खानने केली फसवणुकीची तक्रार
By Admin | Updated: November 2, 2014 01:15 IST2014-11-02T01:15:56+5:302014-11-02T01:15:56+5:30
अभिनेत्री सना खान हिने या प्रकरणी तक्रार करणा:या 4क्वर्षीय महिलेविरोधातच घरे आणि फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 9 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे.

सना खानने केली फसवणुकीची तक्रार
मुंबई : विनयभंगाच्या गुन्ह्यात नुकत्याच अटक झालेल्या अभिनेत्री सना खान हिने या प्रकरणी तक्रार करणा:या 4क्वर्षीय महिलेविरोधातच घरे आणि फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 9 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. सना खानच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी 4क्वर्षीय महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ओशिवरा परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणा:या अभिनेत्री सना खान हिची 4क्वर्षीय महिलेशी ओळख झाली होती. मालाड येथे पुनर्विकासात येणारी दोन झोपडी आणि गोरेगाव येथे ओम्कार डेव्हलपर्समध्ये फ्लॅट घेऊन देण्याच्या बहाण्याने ऑगस्टपासून 28 ऑक्टोबर्पयत या महिलेने तब्बल 9 लाख रुपये उकळले. फसल्याचे लक्षात येताच, या महिलेकडे पैशांची मागणी केली असता, तिने पोलिसांत गुन्हा दाखल करून करियर बरबाद करण्याची धमकी दिल्याचे, अभिनेत्री सना खान हिने तक्रारीत नमूद केले. अभिनेत्री सना खान हिने ज्या महिलेविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे त्या महिलेच्या तक्रारीवरूनच पोलिसांनी सना खानसह पती आणि अन्य एका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)