एकाच दिवशी सोनसाखळी चोरीच्या चार घटना

By Admin | Updated: August 7, 2014 00:53 IST2014-08-07T00:53:54+5:302014-08-07T00:53:54+5:30

शहरात एकाच दिवशी चार ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

On the same day there are four incidents of stolen goldschali | एकाच दिवशी सोनसाखळी चोरीच्या चार घटना

एकाच दिवशी सोनसाखळी चोरीच्या चार घटना

>नवी मुंबई : शहरात एकाच दिवशी चार ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये रस्त्याने महिला  चालत असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून चोरटय़ांनी पळ काढला आहे. त्यामध्ये एकूण 1 लाख 3क् हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. 
नवी मुंबई शहरात सोनसाखळी चोरांनी धुडगूस घातल्याचे सातत्याच्या घटनांवरून दिसून येत आहे. त्यातच मंगळवारी एकाच दिवशी चार ठिकाणी दागिनेचोरीच्या घटना घडल्या आहेत. ऐरोली सेक्टर 8 येथे राहणा:या शकुंतला मुळे (68) ह्या संध्याकाळच्या सुमारास रस्त्याने चालल्या होत्या. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील 3क् हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून नेली. त्याचप्रमाणो सानपाडा सेक्टर 4 येथे राहणा:या सपना नागवेकर (68) यांच्यासोबत अशीच घटना घडली आहे. त्या सोसायटी आवारात रस्त्याने चालल्या असताना मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील 42 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. तर खारघर येथील 47 वर्षीय सुधा मुरलीधरन रस्त्याने  चालत असताना त्यांची सोनसाखळी चोरी झाली. रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 3क् हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली. तर तुर्भे गाव येथे राहणा:या यशोदा म्हात्रे (48) ह्या रस्त्याने  चालल्या असता मोटारसायकलवरून आलेल्या दोघा व्यक्तींनी त्यांचे सोन्याचे गंठन चोरून नेले. या प्रकारात त्यांचे 3क् हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. एकाच दिवशी घडलेल्या या सर्व घटनांमध्ये 1 लाख 3क् हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहे. सोनसाखळी चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसूनही शहरात हे प्रकार सुरुच आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: On the same day there are four incidents of stolen goldschali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.