सांबरकुंड धरणग्रस्तांना मोबदला!
By Admin | Updated: April 2, 2015 22:43 IST2015-04-02T22:43:37+5:302015-04-02T22:43:37+5:30
तालुक्यातील सांबरकुंड धरणामध्ये १३१ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्या मोबदल्यात सरकारने तीन कोटी ९६ लाख ३३ हजार ३८५ रुपये देऊ केले आहेत.

सांबरकुंड धरणग्रस्तांना मोबदला!
आविष्कार देसाई, अलिबाग
तालुक्यातील सांबरकुंड धरणामध्ये १३१ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्या मोबदल्यात सरकारने तीन कोटी ९६ लाख ३३ हजार ३८५ रुपये देऊ केले आहेत. बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या धरण उभारणीच्या कामाला त्यामुळे गती प्राप्त होणार असली तरी, रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
अलिबागपासून जवळच असणाऱ्या महान येथे सांबरकुंड धरण निर्माण करण्याला १९८२ साली प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर त्याला १९९५ साली सुधारित मान्यता देण्यात आल्यानंतर २००१ साली व्दितीय मान्यता देण्यात आली. भूसंपादन कायद्यानुसार येथील जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पार पडली आहे.
खरीप जमिनीचे क्षेत्र सुमारे ५२ हेक्टर, वरकस-३९ हेक्टर आणि पोटखराबा-२२ हेक्टर, असे एकूण १०३ हेक्टर ८१ एकर आणि दोन गुंठे आहे. या जमिनीचे १३१ खातेदार आहेत.
२००८ साली अंतिम निवाडा झाल्यावर जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी २०१५ साल उजाडले असून लवकरच भूसंपादन कायद्यानुसार खातेदारांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. नोटीस घेतल्यानंतर अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयातून रकमेचे वाटप करण्यात येणार असल्याचे धरणग्रस्त आनंदात आहेत.