मुस्लीम मतांसाठी समाजवादी पार्टी - एमआयएम आमने-सामने

By Admin | Updated: February 16, 2017 02:27 IST2017-02-16T02:27:35+5:302017-02-16T02:27:35+5:30

समाजवादी पक्षाच्या वतीने नुकत्याच भायखळा परिसरात पार पडलेल्या जनसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुस्लीम

Samajwadi Party for Muslim votes - MIM face-to-face | मुस्लीम मतांसाठी समाजवादी पार्टी - एमआयएम आमने-सामने

मुस्लीम मतांसाठी समाजवादी पार्टी - एमआयएम आमने-सामने

मुंबई : समाजवादी पक्षाच्या वतीने नुकत्याच भायखळा परिसरात पार पडलेल्या जनसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुस्लीम बांधवांच्या नावावर मते मागणाऱ्या एमआयएम पक्षावर टीका केली. केवळ आश्वासने देण्यापलीकडे मुस्लीम बांधवांनी काय केले, असा सवालही अबू आझमी यांनी उपस्थित केला.
महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने गरीब जनतेसाठी काय केले, असा प्रश्न विचारत शिवसेनेवर जोरदार टीका केली. नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांचे हाल झाले, असे सांगत भाजपावरही जोरदार टीका केली. शिवाय, सत्ताधाऱ्यांसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांवर हल्लाबोल करत भविष्यात मुस्लीम समाजाची दिशाभूल होणार नाही, अशी आशा व्यक्त करत सपाला मत देण्याचे आवाहन केले.
पालिकेच्या ‘ई’ विभागातील २११, २१२ आणि २१३ या प्रभागांत मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. या प्रभागांमध्ये ८० हजारांहून अधिक मुस्लीम मतदार असल्याने आता या समाजाची मते कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)




























































 



























































 

Web Title: Samajwadi Party for Muslim votes - MIM face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.