Join us  

पुन्हा लॉकडाऊन झाल्याने सलूनचालक येणार अडचणीत, असोसिएशनने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 6:08 AM

महाराष्ट्र सलून अ‍ॅण्ड पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला.

मुंबई : राज्यात २८ जुलैपासून सलून सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. पण आता पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सलून बंद ठेवावे लागणार आहे. सलूनचालकांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे, असे महाराष्ट्र सलून अ‍ॅण्ड पार्लर असोसिएशनने सांगितले.महाराष्ट्र सलून अ‍ॅण्ड पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनमुळे सलून चार महिन्यांपासून बंद आहेत. राज्य सरकारने सलून व्यावसायिकांची दिशाभूल केली आहे.काशीद पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून अर्थिक अडचण, दुकानाचे भाडे, घरखर्च भागविणे मुश्कील झाल्यामुळे दहा सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केली आहे.असे असताना सरकारने सलूनचालकांच्या मदतीसाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. सलून सुरू होऊन केवळ १२ दिवस झाले आहेत. सरकारच्या अटीशर्तींसाठी मोठा खर्च करावा लागला. त्यामध्ये सलूनचालकांना घरभाडे, वीजबिल कामगारांचे पैसे द्यायचे आहेत. असे असताना आता पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.ते पुढे म्हणाले की, जेमतेम आठ दिवस काही सलून व्यावसायिकांना सलून सुरू करण्यास वेळ मिळाला आहे. सलूनचालकांवरील कर्जाचे ओझे वाढणार आहे. सलून व्यावसायिकांना अर्थमंत्री अजित पवार यांनी त्वरित आर्थिक पॅकेज जाहीर करावे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात नाभिक समाज व सलून व्यावसायिक राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.सलूनचालक कशी घेतात काळजीअपॉइंटमेंट घेऊन ग्राहकांना बोलाविले जाते. ग्राहकांना हातावर सॅनिटायझर दिले जाते.दोन चेअरमध्ये अंतर ठेवण्यात येते. युज अ‍ॅण्ड थ्रो चादरचा वापर केला जातो. सलूनचालक स्वत: आणि ग्राहक मास्क वापरतात. तसेच सलूनचालक हॅण्ड ग्लोव्हजचा वापर करतात.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस