सलमानच्या बहिणीची पार्टी पोलिसांनी रोखली
By Admin | Updated: August 2, 2015 11:51 IST2015-08-02T03:10:19+5:302015-08-02T11:51:16+5:30
ध्वनिप्रदूषणाचे नियम पायदळी तुडवून अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता हिने वाढदिवसानिमित्त दिलेली पार्टी शुक्रवारी रात्री पोलिसांनी थांबवली. इतकेच नव्हे तर आयोजकांचे डिपॉझिट देखील जप्त केले.

सलमानच्या बहिणीची पार्टी पोलिसांनी रोखली
मुंबई : ध्वनिप्रदूषणाचे नियम पायदळी तुडवून अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता हिने वाढदिवसानिमित्त दिलेली पार्टी शुक्रवारी रात्री पोलिसांनी थांबवली. इतकेच नव्हे तर आयोजकांचे डिपॉझिट देखील जप्त केले.
अर्पिताचा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस होता. तिने आपल्या वांद्रे येथील ह्यपॅसिफिक हाइट्सह्णमधील फ्लॅटमध्ये यानिमित्त जंगी पाटीर्चे आयोजन केले होते. पार्टीला सलमान, वडील सलीम खान, आई हेलन, भाऊ अरबाज, सोहेल, वहिनी मलायका यांच्यासह संपुर्ण कुटुंब हजर होते. शिवाय सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, करिष्मा कपूर, रितेश देशमुख, पत्नी जेनेलिया, इम्रान खान, पुलकीत सम्राट, सोहा अली खान, कुणाल खेमू, शायना एनसी, ईल्ली अव्राम, करण जोहर, दिनो मारियो, चंकी पांडे अशा खास निमंत्रितांचीही हजेरी होती. नियंत्रण कक्षाला मध्यरात्री तीनच्या सुमारास तक्रार आली. त्यानंतर खार पोलिसांनी पॅसिफिक हाईटस गाठले. पोलिसांनी हस्तक्षेप करत पार्टी थांबवली. पार्टीचा आयोजक संतोष माने याला ताब्यात घेत त्याचे साडे बारा हजार रुपयांचे डिपोझीटही जप्त केले, अशी माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भरगुडे यांनी लोकमत ला दिली. या पार्टीत पुरविण्यात आलेले म्युझीक सिस्टम्स हे मानेचेच असल्याचे त्यांनी नमुद केले.