सलमानच्या अडचणी वाढणार ?

By Admin | Updated: March 8, 2015 02:33 IST2015-03-08T02:33:43+5:302015-03-08T02:33:43+5:30

दिवंगत पोलीस हवालदार रवींद्र पाटील यांची साक्ष पुरावा म्हणून वापरण्यास सत्र न्यायालयाने शनिवारी सरकारी पक्षाला परवानगी दिली.

Salman's problems will increase? | सलमानच्या अडचणी वाढणार ?

सलमानच्या अडचणी वाढणार ?

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रनचा अपघात झाला त्या वेळी अभिनेता सलमान खानने मद्यपान केले होते, ही दिवंगत पोलीस हवालदार रवींद्र पाटील यांची साक्ष पुरावा म्हणून वापरण्यास सत्र न्यायालयाने शनिवारी सरकारी पक्षाला परवानगी दिली. या महत्त्वपूर्ण साक्षीवर सरकारी व बचाव पक्ष युक्तिवाद करणार व त्यानंतर ही साक्ष ग्राह्य धरावी की नाही याबाबत न्यायालय निर्णय देणार आहे. ही साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरल्यास सलमानच्या अडचणी वाढू शकतात.
हा अपघात झाला तेव्हा पाटील हा सलमानचा बॉडीगार्ड होता. त्यानेच या अपघाताची पोलिसांत तक्रार नोंदवली. तसेच अपघाताच्या वेळी सलमानने मद्यपान केल्याची साक्ष त्याने दिली होती. गाडी हळू चालव असे मी सलमानला सांगत होतो, असेही पाटीलने दंडाधिकारी न्यायालयाला सांगितले होते. २००७मध्ये पाटीलचे निधन झाले.
त्यानंतर सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यास दंडाधिकारी न्यायालयाने सरकारी पक्षाला परवानगी दिली. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने हा खटला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयातून सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. सत्र न्यायालयात या खटल्याची नव्याने सुनावणी झाली. त्यामुळे पाटील याची साक्ष सरकारी पक्षाला पुरावा म्हणून वापरता यावी, यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अर्ज न्यायालयात केला.
याला सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी विरोध केला. मात्र या साक्षीवर बचाव पक्षाला युक्तिवाद करता येईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने सरकारी पक्षाचा अर्ज मंजूर केला. वांद्रे येथे २००२मध्ये भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडले. यात एकाचा बळी गेला होता. (प्रतिनिधी)

रवींद्र पाटील कोण ?
हा अपघात झाला तेव्हा पाटील हा सलमानचा
बॉडीगार्ड होता. त्यानेच या अपघाताची पोलिसांत
तक्रार नोंदवली. तसेच अपघाताच्या वेळी सलमानने मद्यपान केल्याची साक्ष त्याने दिली होती. २००७ साली त्याचे निधन झाले.

Web Title: Salman's problems will increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.