सलमानचा बर्थडे उत्साहात
By Admin | Updated: December 28, 2014 01:54 IST2014-12-28T01:54:11+5:302014-12-28T01:54:11+5:30
अभिनेता सलमान खान याने आपला वाढदिवस शनिवारी पनवेलजवळील फार्महाऊसवर साजरा केला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी बॉलीवूडमधील अनेकांनी हजेरी लावली.
सलमानचा बर्थडे उत्साहात
पनवेल : अभिनेता सलमान खान याने आपला वाढदिवस शनिवारी पनवेलजवळील फार्महाऊसवर साजरा केला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी बॉलीवूडमधील अनेकांनी हजेरी लावली. त्यामुळे नवीन पनवेल-नेरे रोडवर शुक्रवारी सायंकाळी महागड्या कार धावताना दिसल्या.
नेरे गावाजवळच्या वाजे गावात सलमानचे ‘अर्पिता फार्महाऊस’ आहे. शनिवारी सल्लूमियाँने आपला ४९ वा वाढदिवस येथेच साजरा केला. शुक्रवारी रात्री पार्टीसाठी अजय देवगण, रितेश देशमुख, महेश मांजरेकर, सुनील शेट्टी, प्रियंका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, सोहा अली खान, कुणाल खेमू, आर्य बब्बर, मुग्धा गोडसे, गौहर खान, दीपा शिखा, हुमा कुरेशी, स्नेहा अलान, सुखीन चावला, इमरान खान, राहुल देव यांच्यासह सुमारे चारशे जण पार्टीत सहभागी झाले. खान कुटुंबातील सलीम खान यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सलमानची बहीण अलवीरा आणि अर्पिताने तयार केलेला केक कापण्यात आला.