सलमानने वाहन परवाना सादर करावा
By Admin | Updated: February 21, 2015 03:27 IST2015-02-21T03:27:11+5:302015-02-21T03:27:11+5:30
हिट अॅण्ड रन प्रकरणात शुक्रवारी सरकारी पक्षाने अभिनेता सलमान खानने वाहन परवाना सादर करण्याची मागणी केली़ यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी रीतसर अर्ज न्यायालयात दिला़
सलमानने वाहन परवाना सादर करावा
मुंबई : हिट अॅण्ड रन प्रकरणात शुक्रवारी सरकारी पक्षाने अभिनेता सलमान खानने वाहन परवाना सादर करण्याची मागणी केली़ यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी रीतसर अर्ज न्यायालयात दिला़
सलमानला २००४ मध्ये वाहन परवाना मिळाला होता, अशी साक्ष आरटीओ अधिकाऱ्याने दिली आहे़ याची शहानिशा करण्यासाठी सलमानने वाहन परवाना सादर करावा, असे सरकारी पक्षाने अर्जात नमूद केले आहे़ याला बचाव पक्षाने विरोध केला़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने या अर्जावरील निर्णय येत्या सोमवारपर्यंत राखून ठेवला़
तसेच शुक्रवारी केमिकल अॅनलायझरचीही साक्ष नोंदवण्यात आली़ वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत सलमानने चौघांना चिरडले़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्य वधाचा खटला सुरू आहे़ (प्रतिनिधी)