सलमान खानची सुनावणी लांबणीवर

By Admin | Updated: September 8, 2015 02:50 IST2015-09-08T02:50:22+5:302015-09-08T02:50:22+5:30

अभिनेता सलमान खानविरोधातील सुनावणीसाठी न्यायालय प्रशासनाने तयार केलेल्या कागदपत्रांवर असमाधान व्यक्त करत ही कागदपत्रे नव्याने तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने

Salman Khan's postpone hearing | सलमान खानची सुनावणी लांबणीवर

सलमान खानची सुनावणी लांबणीवर

मुंबई : अभिनेता सलमान खानविरोधातील सुनावणीसाठी न्यायालय प्रशासनाने तयार केलेल्या कागदपत्रांवर असमाधान व्यक्त करत ही कागदपत्रे नव्याने तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी प्रशासनाला दिले़
ही कागदपत्रे ११ सप्टेंबरपर्यंत तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ त्यामुळे सलमान खटला पुन्हा लांबणीवर पडला आहे़ हिट अ‍ॅण्ड रनप्रकरणी दोषी धरत सत्र न्यायालायने मे महिन्यात सलमनाला ५ वर्षांची शिक्षा ठोठावली़ याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली़ या याचिकेवर न्या़ ए़आऱ जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे़ त्यात सलमानने सत्र न्यायालयातील काही कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा केला़ त्याची दखल घेत न्यायालयाने सत्र न्यायालयातील खटल्याची कागदपत्रे नव्याने तयार करण्याचे आदेश न्यायालय प्रशासनाला दिले होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Salman Khan's postpone hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.