Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलीम खान यांच्यावर लीलावतीत अँजिओग्राफी; प्रकृती स्थिर, व्हेंटिलेटरचा वापर हळूहळू कमी करण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 05:39 IST

रुग्णाची अधिक सुरक्षित वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. बुधवारी न्यूरोसर्जन डांगे यांनी डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी प्रक्रिया पूर्ण केली.

मुंबई :  प्रसिद्ध पटकथाकार सलीम खान यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे मंगळवारी लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांच्यावर न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए) केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे तसेच त्यांना लावण्याचा आलेल्या व्हेंटिलेटरचा वापर हळूहळू कमी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लीलावती रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उपचारासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले असून त्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चौहान, कार्डिओलॉजिस्ट डॉ. अजित मेनन, न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. कीर्ती उपाध्याया आणि डॉ. बिनीत आहलुवालिया यांचा समावेश आहे.

रुग्णाची अधिक सुरक्षित वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. बुधवारी न्यूरोसर्जन डांगे यांनी डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया सुरळीत पार पडली असून कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. लीलावती रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. जलिल पारकर यांनी सांगितले की, सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरवरून हळूहळू कमी करण्याची  प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Salim Khan Undergoes Angiography, Condition Stable; Ventilator Use Reduced

Web Summary : Salim Khan was admitted to Lilavati Hospital due to health issues and underwent angiography. His condition is now stable, and doctors are gradually reducing his ventilator use. A team of specialists is overseeing his care, with no surgery performed.
टॅग्स :सलीम खान