खुलेआम होतेय गांजा विक्री

By Admin | Updated: May 14, 2014 23:58 IST2014-05-14T23:58:58+5:302014-05-14T23:58:58+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटबाहेरील महापालिकेचे प्रसाधनगृह गांजा विक्रीचा अड्डा बनला आहे.खुलेआम ५० रूपयांमध्ये गांजाची पुडी विकली जात आहे.

The sale of ganja is open | खुलेआम होतेय गांजा विक्री

खुलेआम होतेय गांजा विक्री

नामदेव मोरे, नवी मुंबई -  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटबाहेरील महापालिकेचे प्रसाधनगृह गांजा विक्रीचा अड्डा बनला आहे. खुलेआम ५० रूपयांमध्ये गांजाची पुडी विकली जात आहे. विशेष म्हणजे पोलीस उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, एपीएमसी पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा व वाहतूक चौकी जवळ असतानाही कोणीच कारवाई करत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. चोरी, घरफोडी करणार्‍या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांचा दरारा नसल्यामुळे शहरात अमली पदार्थांच्या विक्रीचा व्यवसायही तेजीत सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ माथाडी भवन उद्यानाच्या समोरील बाजूला व भाजी मार्केटच्या गेटवर असलेले महापालिकेचे प्रसाधनगृहही गांजा विक्रीचा अड्डा झाला आहे. प्रसाधनगृहाच्या बाजूला पदपथावर बंद पडलेली कार उभी करण्यात आली आहे. या कारमध्ये बसलेल्या तरूणांना ५० रूपयांची नोट दिली की ते तत्काळ गांजाची पुडी देतात. प्रसाधनगृहाच्या बाजूला ठेवलेल्या खुर्चीत बसलेला तरूणही पैसे घेवून तत्काळ अमली पदार्थांची पुडी देत आहे. बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये परप्रांतीय कामगारांचे प्रमाण मोठे आहे. दिवसभर काम करणारे हे कामगार रात्री गांजा ओढतात. त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात खरेदी होत आहे. बेलापूर ते ऐरोलीपर्यंत अनेकजण गांजा घेण्यासाठी याठिकाणी येत आहे. मुख्य रोडवर अनेक महिन्यांपासून हा व्यवसाय सुरू असून त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. पोलीसही या व्यवसायाकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानीक पोलीस कारवाई करत नसल्यामुळे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनीच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The sale of ganja is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.