Join us  

CoronaVirus Fraud: अवघ्या हजार रुपयांत बनावट कोरोना अहवालाची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 6:36 AM

CoronaVirus Fraud: लॅबच्या मूळ अहवालात फेरफार : दुकली गुन्हे शाखेच्या जाळ्यात

 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॅबच्या मुळ अहवालात फेरफार करून अवघ्या हजार रुपयांत कोरोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल तयार करून देणाऱ्या दुकलीला साेमवारी गुन्हे शाखेने अटक केली. राशीद शकील शेख (३२), बिलाल फारुख शेख (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीची नावे असून, त्यांच्याकडे पाेलीस अधिक तपास करत आहेत.मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोगेश्वरी, कुलाबा प्लॉट येथे काही जण मोबाइल व लॅपटॉपच्या सहाय्याने काेराेना रुग्णांना बनावट अहवाल तयार करून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१०चे सहायक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली हाेती. त्यानुसार पोलीस उपायुक्त अकबर पठाण, प्रभारी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने  साेमवारी छापा टाकून कारवाई केली. तेव्हा राशीद आणि फारुख बनावट अहवाल देताना सापडले.यापैकी एकजण वेलनेस लॅबमध्ये लॅब असिस्टंट म्हणून, तर दुसरा ट्रॉमा केअर रुग्णालयात कम्प्युटर असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. एकाने डीएमएलटीची पदवी घेतली असून, दुसरा बारावी पास आहे. दोघेही कृष्णा आणि लाइफ केअर डायग्नोस्टिक लॅबच्या मूळ अहवालात मोबाइल व लॅपटॉपच्या मदतीने फेरफार करून बनावट निगेटिव्ह काेराेना अहवाल तयार करून देत होते. दोघेही जोगेश्वरीचे रहिवासी आहेत. 

काेराेनाची साैम्य लक्षणे असणारे किंवा आपल्याला काेराेना झाला, हे काेणाला समजू नये, गावी तसेच अन्य ठिकाणी जाता यावे, यासाठी काही जण बनावट अहवाल खरेदी करत असल्याचा संशय पाेलिसांना आहे.

पाॅझिटिव्ह रुग्णांकडूनच काेराेना निगेटिव्ह अहवालाची मागणीnअटक दुकली बनावट अहवाल व्हॉट्सॲप करुन गुगल पेवरून पैसे स्वीकारत होते. nमुंबई बाहेर तसेच गावी जाण्यासाठी कोरोना अहवालाची आवश्यकता असल्यामुळे अनेक मंडळी पॉझिटिव्ह रिपोर्ट असतानाही या दुकलीकडून निगेटिव्ह अहवाल तयार करून घेत असल्याचे समाेर आले आहे. nत्यांनी आतापर्यंत किती जणांना अशाप्रकारे अहवाल दिले, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस