फूटपाथ काबीज करत कारची विक्री

By Admin | Updated: January 23, 2017 06:07 IST2017-01-23T06:07:48+5:302017-01-23T06:07:48+5:30

सायन-पनवेल मार्गावरील चेंबूर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. संपूर्ण चेंबूर परिसरात जुन्या वाहनांची

Sale of cars by capturing footpaths | फूटपाथ काबीज करत कारची विक्री

फूटपाथ काबीज करत कारची विक्री

मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील चेंबूर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. संपूर्ण चेंबूर परिसरात जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या माफियांनी फूटपाथ अडवून, त्या ठिकाणी या विक्रीच्या वाहनांची अवैध पार्किंग सुरू केली आहे. या अवैध धंद्यांची कल्पना वाहतूक पोलिसांना असूनही कारवाई झालेली नाही. परिणामी, याचा मोठा मनस्ताप वाहन चालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
चेंबूरमधील कार विक्रेत्यांचे आणि वाहतूक पोलिसांचे साटेलोटे असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत असून, एखाद्या सामान्य वाहन चालकाने त्याची कार अथवा दुचाकी रस्त्यालगत काही मिनिटांसाठी उभी केली, तर त्यावर कारवाई होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पण चेंबूर परिसरात विक्रेत्यांसह अनेक हॉटेल चालकांकडे कार उभ्या करण्याची व्यवस्था नाही आणि संबंधितांकडून रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. मात्र, यावर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात नाही, असे स्थानिकांनी सांगितले.
चेंबूरच्या आर. सी. मार्गावर तर नेहमीच वाहतूककोंडी असते. मात्र, तरीही या परिसरातील एकर्स क्लब, सिंधी सोसायटी जिमखाना, हॉटेल स्टार परेड, हॉटेल स्टेटस, हॉटेल सिंग साहब, हॉटेल कुक आणि रसना पंजाब या हॉटेल्सबाहेर सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात वाहने अनधिकृतरीत्या उभी केली जात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sale of cars by capturing footpaths