सखींना मिळाले केक, अगरबत्ती मेकिंगचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:28 AM2019-07-24T01:28:51+5:302019-07-24T01:29:08+5:30

विशाखा वारीक यांनी सखींना अगरबत्ती बनवायला शिकवले. मसाला आणि सेंटेड अगरबत्ती कशी बनवावी, त्यासाठी कोणते सामान लागते,

Sakhi received cake, incense making lessons | सखींना मिळाले केक, अगरबत्ती मेकिंगचे धडे

सखींना मिळाले केक, अगरबत्ती मेकिंगचे धडे

Next

मुंबई : लोकमत सखी मंचतर्फे ‘केक आणि अगरबत्ती मेकिंग वर्कशॉप’ आयोजित करण्यात आले होते. भांडुप पश्चिमेकडील
टँक रोड येथील हार्मनी बँक्वेट्स सभागृहात नुकतेच सखींनी विविध प्रकारचे केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात ज्यांच्याकडे ओव्हन नसतो त्यांनी कुकरमध्ये केक कसा बनवावा, केकचे विविध प्रकार, केकसाठी लागणारे सामान व प्रमाण किती असावे, क्रीम कसे फेटावे, डेकोरेशन कसे केले जाते, याची माहिती देण्यात आली. हे सगळे शिकताना सखींना अनेक महत्त्वपूर्ण माहिती कार्यशाळेतून देण्यात आली. शेफ आरती निजापकर यांनी सखींना केक बनवताना काय काळजी घ्यावी हे सांगत सखींच्या शंकांचे निरसन केले.

विशाखा वारीक यांनी सखींना अगरबत्ती बनवायला शिकवले. मसाला आणि सेंटेड अगरबत्ती कशी बनवावी, त्यासाठी कोणते सामान लागते, तसेच अगरबत्ती बनविण्याची प्रक्रिया वारीक यांनी उपस्थित सखींना उत्तमरीत्या समजावून सांगितली. सखींना या कार्यक्रमाचा खूप फायदा झाला.

Web Title: Sakhi received cake, incense making lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत