Join us  

साजिद खानचे एक वर्षासाठी निलंबन; मीटू प्रकरणी इफ्दाकडून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 6:04 AM

मीटू प्रकरणात लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप असलेल्या दिग्दर्शक साजिद खानवर, भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेने एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

मुंबई : मीटू प्रकरणात लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप असलेल्या दिग्दर्शक साजिद खानवर, भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेने एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई केली आहे. महिन्याभरापूर्वी या संघटनेने साजिद खानला नोटीस पाठविली होती. स्वत:ची बाजू मांडण्याची वेळ साजिदला देऊनही त्याने केवळ थातूरमातूर उत्तरे दिल्याने, त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.रेचल व्हाइट, करिश्मा उपाध्याय, सलोनी चोप्रा, सिमरन सुरी या चौघींनी साजिदविरोधात भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेकडे (कऋळऊअ) तक्रार केली होती. या चारही महिलांनी साजिदने असभ्य वर्तणूक, लैंगिक गैरवर्तणूक, शरीरसुखाची मागणी, मानसिक छळ केल्याची तक्रार केली होती, तसेच सोशल मीडियावर आपल्यावरील अन्यायाला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर, अक्षय कुमार, रितेश देशमुख यांनी साजिदसोबत काम करण्यास नकार दिला, स्वत: साजिदने नैतिक जबाबदारी स्वीकारत, ‘हाऊसफुल्ल ४’चे दिग्दर्शनही सोडले. यानंतर साजिद खानला भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेने नोटीस पाठविली. वेळ देऊनही त्याने स्वत:ची बाजू मांडली नाही. त्यामुळे निलंबन केल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

टॅग्स :मीटूसाजिद खान