सायरा शेखला झाला होता डेंग्यू
By Admin | Updated: August 24, 2014 01:53 IST2014-08-24T01:53:04+5:302014-08-24T01:53:04+5:30
कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये तापाच्या इंजेक्शनची अॅलर्जी झाल्यामुळे केईएम रुग्णालयात दाखल केलेल्या सायरा शेख (47) हिला डेंग्यूची लागण झाली होती,

सायरा शेखला झाला होता डेंग्यू
मुंबई : कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये तापाच्या इंजेक्शनची अॅलर्जी झाल्यामुळे केईएम रुग्णालयात दाखल केलेल्या सायरा शेख (47) हिला डेंग्यूची लागण झाली होती, असे रक्त तपसणी अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. मात्र तिचा शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आला नसल्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
18 ऑगस्ट रोजी रात्री 1क्.3क् च्या सुमारास कुर्ला भाभा रुग्णालयामध्ये तापाच्या इंजेक्शनची 32 महिलांना अॅलर्जी झाली होती. यापैकी 11 महिलांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. इंजेक्शनची अॅलर्जी झालेल्या सायरा शेख हिचा 19 ऑगस्ट रोजी रात्री केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. भाभा रुग्णालयात तिला टायफॉइड झाला म्हणून दाखल केल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले होते. सायराला केईएममध्ये आणले तेव्हा तिची प्रकृती खालावली होती. म्हणून तत्काळ तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तिचे रक्त तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवले होते. तपासणीमध्ये सायरा हिला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली.
सायरा हिचे शवविच्छेदन जे. जे. रुग्णालयात झाले आहे. मात्र शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये सर्व तपासण्या झाल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे लिहिण्यात आले आहे. सायराला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता तिचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला, हे सांगता येणो शक्य नाही. तेच इंजेक्शन घेतल्यामुळे अॅलर्जी आलेल्या इतर सर्व रुग्णांची प्रकृती सुधारते आहे. यामुळे सायराच्या मृत्यूचे कारण वेगळेही असू शकते, असा अंदाज महापालिकेच्या वैद्यकीय अधिका:यांनी व्यक्त केला.
च्कुर्ला भाभा रुग्णालयानंतर तसाच प्रकार राजावाडी रुग्णालयातही घडला आहे. भाभा रुग्णालयात सेफोटॅक्ङिाम आणि सेफ्ट्रीअॅक्झोन या दोन प्रतिजैविकांमुळे झालेल्या अॅलर्जीमुळे त्या बॅचचा वापर बंद करण्यात आला होता.
च्आता मात्र या कंपनीच्या या दोन आणि एका औषधाचा वापर पूर्णपणो थांबवण्यात आला आहे. रुग्णालयामध्येही या दोन्ही औषधांचा वापर थांबवल्याचे डॉ. नागदा यांनी सांगितले.