Join us
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2018: तैमुरला मिळणारी प्रसिद्धी पाहून सैफ आणि मला कधीकधी भीती वाटते- करीना कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 09:56 IST

तैमुरला उगाचच प्रसिद्धी देण्यापेक्षा भविष्यात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळावी, असे मला वाटते.

मुंबई: तैमुरला प्रसारमाध्यमांकडून दिली जाणारी प्रसिद्धी पाहून सैफ आणि मला कधीकधी भीती वाटते. त्याला माध्यमांनी अक्षरश: राजकीय नेता केले आहे, असे विधान बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने केले. ती मंगळवारी  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या मुलाखतीत बोलत होती. यावेळी करिनाला तैमुरबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांना करिनाने आईच्या भूमिकेतून मोकळेपणाने उत्तरे दिली.तैमुरला एखाद्या नेत्यासारखी मिळणारी प्रसिद्धी पाहून सैफ आणि मला कधीकधी भीती वाटते. कारण काहीही झाले तरी शेवटी मी एक आई आहे. त्यामुळे माझ्या मनात स्वाभाविकपणे त्याच्या सुरक्षेचा मुद्दा येतो. परंतु, त्याला पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटतो ही बाबदेखील समाधानकारक असल्याचे करिनाने सांगितले. तैमुरला उगाचच प्रसिद्धी देण्यापेक्षा भविष्यात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळावी, असे मला वाटते. मात्र, सध्या त्याच्यावर असलेले एकूणच प्रसिद्धीचे ओझे पाहून मला खरंच काळजी वाटते, असे करिनाने सांगितले. 

टॅग्स :लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन २०१८करिना कपूरतैमुर