साई, रा.काँच्या मदतीने सेनेचा महापौर
By Admin | Updated: October 4, 2014 23:10 IST2014-10-04T23:10:21+5:302014-10-04T23:10:21+5:30
चार अपक्ष नगरसेवकांनी ऐन वेळेवर दगा दिल्याने पालिकेवर शिवसेना प्रणित आघाडीने सत्ता मिळविली आहे.

साई, रा.काँच्या मदतीने सेनेचा महापौर
>ेसदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
महापौर पदाच्या निवडणुकीत साई पक्षासह कॉग्रेस, राष्ट्वादी पक्षाचे प्रत्येकी दोन नगरसेवक गैरहजर राहिल्याने व चार अपक्ष नगरसेवकांनी ऐन वेळेवर दगा दिल्याने पालिकेवर शिवसेना प्रणित आघाडीने सत्ता मिळविली आहे. तसेच साई पक्षाची मक्तेदारी तोडण्यात शिवसेनेला यश आले आहे.
महापालिकेतील कलानींची सत्ता उलथवून टाकण्याची महत्वपूर्ण भूमिका साई पक्षाच्या जीवन इदनानी यांनी साडे सात वर्षापूर्वीच केली होती. मात्र महापौर राजीनामा नाटयवेळी साई पक्षाच्या महापौर आशा इदनानी यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांना शिवसैनिकानी मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी साई पक्षाने शिवसेना-भाजपाला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी पक्षासोबत घरोबा केला होता.
महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाचे-21, कॉग्रेसचे-6, साई पक्षाचे-1क् व अपक्ष-4 यांच्या मदतीने महापौर-उपमहापौर पदे खेचून आणण्याचा र्पयत साई पक्षाचे जीवन इदनानी व ज्योती कलानी यांनी केला होता. मात्र एका रात्रीत शिवसेनेने राजकिय चक्रे फिरवित चार अपक्ष नगरसेवकांना महायुतीच्या तंबूत आणण्यात यश मिळविले. तर राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक जाफरअली चौधरी, राजू कंडारे, कॉग्रेस पक्षाच्या मीना सोंडे, जया साधवानी, साई पक्षाच्या अनिता तरे, अंकुश म्हस्के यांना गैरहजर ठेवण्याची खेळी खेळली आहे. महापौर पद शिवसेनेकडे आल्याने त्याचा परिणाम कल्याण पुर्व, अंबरनाथ व उल्हासनगर मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार आहे.