पालिकेवर भगवा फडकवणार

By Admin | Updated: January 24, 2015 01:15 IST2015-01-24T01:15:10+5:302015-01-24T01:15:10+5:30

नवी मुंबईवर भगवा फडकावून बाळासाहेबांचे स्वप्न शिवसैनिकांना पूर्ण करायचे आहे.

Saffron hoop | पालिकेवर भगवा फडकवणार

पालिकेवर भगवा फडकवणार

नवी मुंबई : नवी मुंबईवर भगवा फडकावून बाळासाहेबांचे स्वप्न शिवसैनिकांना पूर्ण करायचे आहे. त्याकरिता येणाऱ्या पालिका निवडणुकीत शिवसैनिकांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी वाशी येथे सत्कार करण्यात आला. नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांना बदल हवा असल्याने येत्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले संपूर्ण लक्ष नवी मुंबईवरच राहणार असल्याचे पालकमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नवी मुंबईवर पुन्हा भगवा फडकलेला पहायचे होते. त्यांचे हे स्वप्न शिवसैनिकांना पूर्ण करायचे असून त्यासाठी एकजुटीने कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्यानुसार येत्या पालिका निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवाय राज्यातील अस्थिरता संपवून स्थिर सरकार देण्याचे कामही उध्द्व ठाकरे यांनी केले असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमप्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत निष्ठावंतांना न्याय मिळावा, अशी भूमिका मांडली. त्यावरुन शिवसेनेच्या ज्या निष्ठावंतांनी कष्ट सोसले त्यांनाच पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. तर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री शिंदे यांनी आठवड्याचा एक दिवस नवी मुंबईकरांसाठी द्यावा, असेही नाहटा यांनी सूचित केले. (प्रतिनिधी)

माजी जिल्हाप्रमुखांना डावलले
च्माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांना कार्यक्रमात पूर्णपणे डावलले होते. त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला असल्याने कार्यक्रमाच्या होर्डिंगवरून त्यांचे फोटो वगळण्यात आलेले होते. शिवाय व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांचा सत्कार अथवा नावाचा उल्लेखही टाळला गेला. त्यामुळे चौगुले यांना मिळालेल्या दुजाभावाच्या वागणुकीची चौगुले समर्थकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
अर्धा तासाच्या कार्यक्रमाला पाच तास उशीर
च्पालकमंत्रीपद मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमासाठीच शिंदे हे तब्बल पाच तास उशिरा पोचले. या कालावधीत मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा अवधी देखील संपला होता. त्यामुळे लांबत चाललेल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनाच व्यासपीठावर जाऊन काव्य, शेरोशायरी, गाणी यांच्या माध्यमातून उपस्थितांचा कंटाळा दूर करावा लागला. अखेर पाच तास उशिरा पोचलेल्या शिंदे यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावल्याचे सांगत उपस्थितांची दिलगिरीही व्यक्त केली. परंतु शिवसेनेच्या कार्यक्रमास नेहमी खचाखच भरणारी विष्णुदास भावे नाट्यगृहाची बाल्कनी मात्र यावेळी रिकामीच दिसली.

Web Title: Saffron hoop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.