रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वा:यावर!

By Admin | Updated: October 2, 2014 22:59 IST2014-10-02T22:59:28+5:302014-10-02T22:59:28+5:30

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच रेल्वे पोलिसांनाही डय़ुटी नेमून देण्यात आली आहे.

Safety of the passengers: On this! | रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वा:यावर!

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वा:यावर!

>मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच रेल्वे पोलिसांनाही डय़ुटी नेमून देण्यात आली आहे. यात मुंबईतील तब्बल 2,4क्क् रेल्वे पोलिसांचा (जीआरपी) निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी समावेश करण्याचा निर्णय झाला असून, त्यामुळे अवघ्या 1,1क्क् रेल्वे पोलिसांवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची मदार असणार आहे. निवडणुकीच्या बंदोबस्ताची जबाबदारी दिलेल्या रेल्वे 
पोलिसांना राज्यातील अनेक जिल्ह्यांत बंदोबस्तासाठी जावे लागणार आहे. 
मध्य रेल्वेच्या मेन लाइनचा पसारा हा खोपोली, कसारा आणि हार्बरचा पनवेल, उरणर्पयत असून पश्चिम रेल्वेचा पसारा डहाणूर्पयत आहे. या रेल्वेमार्गावरून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवास करणा:या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी  जीआरपीकडे (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) आहे. सध्या 3,5क्क् रेल्वे पोलीस स्थानकांवर आणि लोकलमधील महिला डब्यातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. मात्र 15 ऑक्टोबरपासून सुरू 
होणा:या विधानसभा निवडणुकीत यातील काही पोलीस निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. जवळपास 2,4क्क् रेल्वे पोलिसांना निवडणुकीतील बंदोबस्ताची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे अवघ्या 1,1क्क् रेल्वे पोलिसांवर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी राहील. 
निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असणारे रेल्वे पोलीस राज्यातील सहा जिल्ह्यांत पाठवण्यात येतील. या पोलिसांना 1क् ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर्पयत बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा मुंबईतील शहर आणि उपनगरांतील स्थानकांवर नियमित डय़ुटी त्यांना लागेल. मात्र बंदोबस्तासाठी मोठय़ा प्रमाणात रेल्वे पोलीस राज्यातील जिल्ह्यांमध्ये जाणार असल्याने 1,1क्क् रेल्वे पोलिसांवर डबल डय़ुटीची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
 
च्निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी काही रेल्वे पोलीस राज्यातील अन्य भागात जाणार जरी असले तरी कार्यरत पोलीस आपली जबाबदारी योग्य त:हेने पार पाडतील. त्यांना फक्त थोडे अधिक काम करावे लागेल, असे जीआरपीचे आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितले.
 
च्नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 3,5क्क् जीआरपींपैकी जवळपास दीड हजार जीआरपींना मुंबईबाहेर बंदोबस्तासाठी जावे लागले होते. 
 
च्यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वर्धा, अमरावती शहर आणि ग्रामीण, नागपूर शहर आणि ग्रामीण यासह अनेक जिल्ह्यांत मुंबईतील रेल्वे पोलिसांना बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते.

Web Title: Safety of the passengers: On this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.