रुग्णालयांत 29 हजार मातांची सुरक्षित प्रसूती

By Admin | Updated: July 10, 2014 00:15 IST2014-07-10T00:15:11+5:302014-07-10T00:15:11+5:30

पुनर्जन्माचा प्रसंग असलेल्या प्रसूतीच्या काळात मातेची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. यातील धोके टाळण्यासाठी रुग्णालयात प्रसूती होणो आवश्यक आहे.

The safe delivery of 29 thousand mothers in the hospitals | रुग्णालयांत 29 हजार मातांची सुरक्षित प्रसूती

रुग्णालयांत 29 हजार मातांची सुरक्षित प्रसूती

सुरेश लोखंडे - ठाणो
पुनर्जन्माचा प्रसंग असलेल्या प्रसूतीच्या काळात मातेची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. यातील धोके टाळण्यासाठी रुग्णालयात प्रसूती होणो आवश्यक आहे. यासाठी राज्य व केंद्र शासनाद्वारे जननी सुरक्षा योजना (जेएसवाय) व जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम (जेएसएसके) राबवले जात आहेत. याद्वारे आवश्यक त्या सोयी-सुविधा व रोख रक्कम देऊन जिल्ह्यातील 29 हजार 9क् मातांची सुरक्षितपणो शासकीय रुग्णालयांत प्रसूती करण्यात आली आहे. मातृत्व सुरक्षा दिनाचे औचित्य साधून लोकमतने घेतलेल्या आढाव्याद्वारे हे उघड झाले आहे. 
घरातील लहान-मोठय़ांच्या सेवेसाठी आयुष्य खर्ची घालणा:या मातेला मात्र प्रसूतीच्या काळातील असहाय वेदनांमुळे वेळप्रसंगी जीव गमवावा लागतो. या जीवघेण्या प्रसंगातून तिची सुटका करणो प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी प्रथमत: तिची प्रसूती घरी न करता रुग्णालयातच करण्याची व्यवस्था करणो किंवा आधीच नियोजन करणो कुटुंबातील सर्वाचे कर्तव्य आहे. यासाठी शासनानेदेखील जननी सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. यामध्ये रुग्णालयात प्रसूत झालेल्या ग्रामीण भागातील मातेला तत्काळ 7क्क् रुपये तर शहरातील मातेला 6क्क् रुपयांचे मानधन दिले जात आहे. घरी प्रसूत झालेल्या मातेला 5क्क् रुपये तर तिला सेवा देणा:या ‘आशा’ कार्यकर्ता महिलेलादेखील 6क्क् रुपयांचे मानधन शासनाकडून तत्काळ दिले जाते. यासाठी मार्चअखेर सुमारे 37 हजार 95क् मातांची नोंदणी झाली असता त्यातील 29 हजार 9क् मातांची प्रसूती रुग्णालयांमध्ये झाली आहे.
कोठेही गर्भलिंगनिदान होऊ दिले जात नाही. यामुळे मुलींचा जन्मदर आता वाढलेला आहे. याशिवाय, मुलींच्या अल्पवयातील लगAाला विरोध करणा:या जनजागृतीसह बाळंतपण रुग्णालयातच होणो आवश्यक असल्याची मोहीम हाती घेऊन मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. यामुळे  सुमारे 92 टक्के प्रसूती आता रुग्णालयांमध्ये होत असून अत्यल्प म्हणजे पॉइंट शून्य प्रसूती घरी होत असल्याचा दावा कोकण विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी केला आहे. 
 गर्भावस्थेतील मातेला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात आणण्यासाठी केवळ 1क्2 या दूरध्वनीवर फोन करताच तिच्या घरी काही मिनिटांत मोफत अॅम्ब्युलन्स सेवा दिली जात आहे. वर्षभरात जिल्हाभरातून 37 हजार 95क् दूरध्वनी कॉलवर मातेच्या घरी अॅम्ब्युलन्स गेली आहे. प्रसूतीला रुग्णालयात जाण्यासाठी 27 हजार मातांनी या अॅम्ब्युलन्सचा लाभ घेतला आहे. यापैकी 26 हजार मातांनी रुग्णालयातून घरी जाण्यासाठी या वाहनाचा लाभ घेतलेला असून  15 हजार 288 मातांनी घर ते रुग्णालय यासाठी या अॅम्ब्युलन्सचा वापर केला आहे. याशिवाय, एक हजार 3क्क् बालकांना दुस:या रुग्णालयात  उपचारासाठी ने-आण करण्यासाठी या अॅम्ब्युलन्सचा मोफत वापर करण्यात आला आहे.ाजल्ह्यात सुमारे 32 हजार  स्तनदा माता ठाणो जिल्ह्यात आहे. व त्या सुरक्षित आहेत.
 
4ठाणो जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे 88क् महिला असे प्रमाण आहे. लोकसंख्येस अनुसरून जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण  86.18 टक्के असून स्त्री साक्षरतेचे प्रमाण 8क्.78 टक्के आहे. भारतामध्ये एक लाख मातांमध्ये 187 माता मृत्यूचे प्रमाण आहे. 
 
4याप्रमाणोच महाराष्ट्रातदेखील एक लाख महिलांमागे 87 महिलांच्या मृत्यूचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. यानुसार, ठाणो जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत 34 महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झालेला आहे. मागील सुमारे सहा वर्षाच्या कालावधीपेक्षा मृत्यूचे हे प्रमाण कमी असल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले. दुर्धर आजाराने सुमारे 41क् बालके जर्जर असल्याचे आढळून आले आहे.
 
पोषक व पोषण आहार : आहार- गरोदर व स्तनदा मातांनी आहारात प्रथिने, स्निग्ध व पिष्ठमय पदार्थ घेणो आवश्यक आहे. शिवाय कॅल्शियम, लोह फॉलिक अॅसिड आणि ‘अ’ जीवनसत्त्वाचा आहार घ्यावा.  चार वेळा आहार  घेणो आवश्यक असून यात रंगीत भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, ‘क’ जीवनसत्त्व, लिंबू, आवळा, अंडी, मांस, नाचणी, तीळ आहारात घेणो आरोग्याच्या हिताचे आहे. 

 

Web Title: The safe delivery of 29 thousand mothers in the hospitals