Join us  

CoronaVirus: जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्यास सरकारची परवानगी, पण 'हे' नियम पाळावे लागणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 4:41 PM

CoronaVirus: जैन समाजाच्या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर साधू-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचं संकट आणखी भीषण होत चाललं आहे. रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं ठाकरे सरकारवरही विरोधकांकडून सातत्यानं हल्ले होत आहेत. पण अशा परिस्थितीतही ठाकरे सरकार सामान्यांना शक्य तितका दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. आता जैन समाजाच्या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर साधू-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण त्यासाठी काही अटी अन् शर्थींचे पालन करण्यासही सांगितलं आहे. जैन समाजाच्या चातुर्मास पर्वास जुलै महिन्यात प्रारंभ होत असून, या चातुर्मास काळात जैन समाजाचे साधू साध्वी निश्चित केलेल्या चातुर्मास स्थळी पोहोचविण्यासाठी पायी प्रवास  करीत असतात. काही वृद्धा साधू-साध्वी प्रकृतीच्या कारणास्तव व्हील चेअरनं प्रवास करतात. या प्रकारे प्रवास करून हे साधू-साध्वी चातुर्मास स्थळी त्यांच्या सेवक वर्गासह पोहोचतात. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यानं अनेक भागातून  साधू साध्वी प्रवास करू शकत नाहीत. परंतु चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारित स्थळी पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे जैन समाजाच्या  साधू-साध्वी व सेवक वर्ग यांना त्यांच्या चातुर्मास स्थळीपोहोचवण्यासाठी काही अटी अन् शर्थी लावून परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रवासादरम्यान व मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता व एकूणच कायदा व सुव्यवस्था  राखली जाईल याची जिल्हा व पोलीस प्रशासनानं दक्षता घ्यावी. हे नियम पाळावेच लागणार

  • पायी प्रवासादरम्यान गर्दी होणार नाही व ५ पेक्षा जास्त जण एकत्रित प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • ज्या  ठिकाणी त्यांच्या मुक्काम आहे. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • कोरोनासंदर्भातील केंद्र आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 
  • प्रवासादरम्यान २ व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर ठेवावे व मास्कचा वापर करण्याची दक्षता घ्यावी.  

हेही वाचा!

CoronaVirus: विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ठोस तोडगा काढण्याचे निर्देश

CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस