सचिन तेंडुलकरला भावली राधिकाची चित्रकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:11+5:302021-09-02T04:13:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अनेकदा असे म्हटले जाते की ‘एक चित्र हजार शब्द बोलते’ आणि जेव्हा तुम्ही तिच्या ...

Sachin Tendulkar's brother-in-law Radhika's painting | सचिन तेंडुलकरला भावली राधिकाची चित्रकला

सचिन तेंडुलकरला भावली राधिकाची चित्रकला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अनेकदा असे म्हटले जाते की ‘एक चित्र हजार शब्द बोलते’ आणि जेव्हा तुम्ही तिच्या चित्रांना भेटता तेव्हा क्वचितच शंका येते की ही म्हण खोटी आहे. राधिका गायतोंडे-नेरुरकर ही शिवाजी पार्कची असामान्य प्रतिभा असलेली एक साधी मुलगी. आजच्या डिजिटलायझेशनच्या या जगात राधिकाची चित्रे तुमचे हृदय वितळविण्यास बांधील आहेत.

सर्व काळातील महान कलाकारांपैकी एक लिओनार्डो दा विंची यांच्या प्रेरणेने आता गोव्यात स्थायिक झालेल्या मुंबईच्या राधिका हिने चित्रकलेच्या कॅनव्हासवर स्वतःचे नाव कोरले आहे.

‘इलस्ट्रेशन’मध्ये मुख्य ठळक वैशिष्ट्यांसह ललित कला, लँडस्केप आणि पोर्ट्रेटमध्ये विशेषीकरणासह व्यावसायिक कलांचा तिने अभ्यास केला. एका सुंदर आणि भव्य कलेचे रूप धारण करणारी आणि मनाला भावणारी चित्रकला हे तिचे वैशिष्ट्य आहे.

अलीकडच्या काळात तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि तापसी पन्नू यांच्यासोबत हुबेहूब काढलेली त्यांची चित्रे शेअरदेखील केली.

जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला राधिकाची चित्रकला खूप भावली. माझा एक जवळचा मित्र आहे जो त्यांना चांगला ओळखतो आणि त्याने सचिनला माझी चित्रे दाखवली आणि त्याला ती खूप आवडली. सचिन म्हणाला, ‘मला या कलाकाराला भेटायचे आहे.’ तर एकेदिवशी चक्क जगातल्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी मला सांगितले की, ‘त्याला त्याचे आणि त्याच्या आईचे चित्र हवे आहे.’ त्याला माझे चित्र इतके आवडले की त्याने मला आणखी एक ऑर्डर दिली. ‘मी आतापर्यंत पाहिलेले सुंदर चित्र आहे. तुम्ही एक उत्कृष्ट आणि वास्तववादी कलाकार आहात’, अशी दाद त्यांनी दिली. मी खूप भारावून गेले, असे राधिकाने सांगितले.

वयाच्या पाचव्या वर्षापासून मी या कलेकडे आकर्षित झाले. कुटुंब आणि विशेषत: आजोबांनीच या उत्कटतेसाठी प्रेरित केले. मी केलेल्या प्रत्येक कलेत माझ्या आई आणि वडिलांनी मला नेहमीच साथ दिली. आई माझी सर्वात मोठी टीकाकार आहे. लग्नानंतर आता माझे सासरे आणि सासू आणि पतीकडून समान समर्थन आणि प्रेम मिळाल्याबद्दल धन्यता वाटते, असे तिने आवर्जून सांगितले. एखाद्या दिवशी एक कला प्रदर्शन उभारणे आणि तिच्या सहकारी कलाकारांना त्यांच्या उत्कटतेसाठी पाठिंबा हे तिचे मिशन आहे.

----------------------------------------

Web Title: Sachin Tendulkar's brother-in-law Radhika's painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.