चेंबूरमधील रायन स्कूलचा अनोखा ‘ग्रॅज्युएशन-डे’
By Admin | Updated: February 17, 2017 02:35 IST2017-02-17T02:35:13+5:302017-02-17T02:35:13+5:30
चेंबूरमधील रायन इंटरनॅशनल स्कूलचा ग्रॅज्युएशन डे शनिवारी उत्साहात पार पडला. चेंबूरमधील फाइन आर्ट सभागृहात हा कार्यक्रम

चेंबूरमधील रायन स्कूलचा अनोखा ‘ग्रॅज्युएशन-डे’
मुंबई : चेंबूरमधील रायन इंटरनॅशनल स्कूलचा ग्रॅज्युएशन डे शनिवारी उत्साहात पार पडला. चेंबूरमधील फाइन आर्ट सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी कार्यक्रमाला हजेरी लावत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
सीनियर केजीमधून पहिली इयत्तेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासात उत्साह वाढावा, याशिवाय पुढील आयुष्यात हा दिवस त्यांच्या कायम लक्षात राहावा, यासाठी दरवर्षी रायन स्कूलमध्ये हा दिवस साजरा केला जातो. यंदा चेंबूरमधील फाइन आर्ट सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, अभिनेत्री श्रेत्रा बुगडे, लेखक चेतन भगत यांचे बंधू केतन भगत आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनची पहिली डीग्री देण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका सोनल पिंटोदेखील उपस्थित होत्या. मुलांचा उत्साह वाढावा म्हणून अशा प्रकारे वेगळे कार्यक्रम नेहमीच घेत असल्याची भावना या वेळी मुख्याध्यापिका फिलोनिमा डिसोझा यांनी व्यक्त केली. या वेळी चिमुरड्यांनी विविध गाण्यांवर नृत्यही सादर केले. याशिवाय या वेळी विविध गाणीदेखील मुलांनी गायली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. (प्रतिनिधी)